Home भद्रावती मनसे जनहित कक्षाचे राज्य सरचिटणीस जोशी यांचे भद्रावती- चंद्रपूर येथे जंगी स्वागत.

मनसे जनहित कक्षाचे राज्य सरचिटणीस जोशी यांचे भद्रावती- चंद्रपूर येथे जंगी स्वागत.

असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश. सुनील गुडे,उमाशंकर तिवारी रमेश कालबान्धे विजय तुरक्याल यांचे नेत्रुत्व.

भद्रावती प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व जनहित कक्ष व विधी विभागाचे प्रदेश अध्यक्ष ऍड. श्री. किशोर शिंदे यांच्या संमतीने, चंद्रपूर जिल्ह्यात जनहित कक्ष व विधी विभागाच्या संघटन वाढीकडे लक्ष केंद्रित करून प्रदेश सरचिटणीस महेश जोशी यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा झंझावती दौरा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेची ताकत असलेल्या वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात भद्रावती रेस्ट हाऊस मधे अनेक राजकीय सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मनसेत पक्ष प्रवेश कार्यक्रम या विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुडेकर, जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कालबान्धे यांच्या नेत्रुत्वात तर चंद्रपूर शहारात शहर अध्यक्ष विजय तुरक्याल यांच्या नेत्रुत्वात घेण्यात आला, याप्रसंगी मनसेचे नेते व या विभागाचे मनसे उमेदवार रमेश राजूरकर, चंद्रपूर जिल्हा संपर्क अध्यक्ष सचिन भोयर, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, विधी विभागाच्या जिल्हाध्यक्षा ऍड. मंजू लेडांगे, जिल्हा अध्यक्ष राजू बघेल जनहित कक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष अरुण तिवारी, जिल्हा सचिव पराग सावजी, उपशहर अध्यक्ष सुहास धुरत, शिक्षक सेनेचे उपशहर अध्यक्ष नितीन किटे आवर्जून उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे ज्वलंत व विकासाभिमुख विचारांनी प्रेरित होऊन, जनहित कक्षाचे प्रदेश अध्यक्ष ऍड. श्री. किशोर शिंदे यांचे सक्षम व सर्वसमावेशक नेतृत्व, प्रदेश सरचिटणीस महेश जोशी तसेच मनसे व जनहित कक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेऊन भद्रावती, चंद्रपूर व आजूबाजूच्या गावातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील काही प्रमुख मंडळी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या संख्येत प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशात मोठ्या संख्येत महिला भगिनींनी प्रवेश घेतला. या सर्व प्रमुख नेत्यांनी पक्ष प्रवेश कर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मनसे जनहित विधी कक्ष विभागाची पक्षात मोठी भूमिका असून जनतेचे जनहिताचे व न्याय व्यवस्थेतल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या विभागाचे आहे आणि म्हणूनच या विभागाचा विस्तार मोठा करून पक्ष संघटनेला बळकट करण्याचे काम या विभागाचे सरचिटणीस महेश जोशी यांच्या मार्गदर्शनात विदर्भात होत आहे, त्या अनुषंगाने चंद्रपूर दौरा विशेष महत्वाचा ठरला असून भद्रावती आणि चंद्रपूर शहरात झालेल्या भव्य पक्ष प्रवेशाने जोशी यांचे स्वागत करण्यात आले.

Previous articleक्राईम ब्लास्ट :- कशी झाली तंटामुक्ती अध्यक्षांची हत्त्या ?
Next articleब्रेकिंग:- चंद्रपूर जिल्हा परिषदच्या पंचायत विभागात पद नियुक्ती घोटाळा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here