Home वरोरा क्राईम ब्लास्ट :- कशी झाली तंटामुक्ती अध्यक्षांची हत्त्या ?

क्राईम ब्लास्ट :- कशी झाली तंटामुक्ती अध्यक्षांची हत्त्या ?

आरोपी दोन दिवस गावातच फिरत होता. महेशची हत्त्या करण्यासाठी सुपारी ? चर्चेला उधाण.

वरोरा प्रतिनिधी :-

मागील दोन दिवसांपासून घराच्या बाहेर पडलेला 25 वर्षीय युवक जो शेगांव सारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावाचा तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होता तो मिळत नसल्याने पोलीस तक्रार करण्यात आली व दोन दिवसाने म्हणजे दिनांक २३/०४/२०२२ रोजी पो.स्टे. शेगांवच्या हद्दीत मौजा मेसा गावाजवळील जंगल शिवारात महेश बबनराव घोडमारे यांचे प्रेत मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती,दरम्यान ज्या स्वप्नील चौधरी याने महेश सोबत असल्याचे सांगितले तोच हत्त्यारा होता व त्याचे सोबत एक साथीदार होता त्याला पण पोलिसांनी पकडले मात्र या प्रकरणात मुख्य सुत्रदार हा वेगळा आहे, सुपारी देऊन महेश ची हत्या करण्यात आली आणि हा नियोजित कट रचुन हत्त्या केल्याचा प्रकार आहे त्यामुळे या प्रकरणात केवळ दोन आरोपी नाही तर आणखी आरोपी या असल्याचे मृतक मुलांच्या भावाचे म्हणणे आहे.

कसा झाला आरोपी चा भांडाफोड ?

शेगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे नितीन बबनराव घोडमारे वय ३४ वर्षे रा. शेगाव यांनी तोडी रिपोर्ट दिला की, दि. २१/०४/२०२२ रोजी त्याचा लहान भाऊ महेश बबनराव घोडमारे वय २५ वर्षे रा. शेगांव हा त्यांचे गावातील स्वप्नील दयाकर चौधरी याचे मोटार सायकलवर गेला. तेव्हा पासून घरी आला नाही त्याचा शोध घेत असता त्यांना मिळालेल्या खबरे वरून त्यांनी मौजा मेसा गावाजवळील जंगल शिवारात शोध घेतला असता त्यांचा भाऊ महेश बबनराव घोडमारे वय २५ वर्षे रा. शेगांव याचा मृतदेह दिसून आला मृतकाचे डोक्याला मार, चप्पल अस्ताव्यस्त स्थीतीत, रक्ताने माखलेले गोटे, त्याचे चेहऱ्यावर, डोक्यावर मार व बाजुचे झुडपात स्टील रॉड अशा संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला व त्याचा भावास कोणीतरी अज्ञात इसमाने जिवानीशी ठार मारले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. गांव येथे पो.स्टे. शेगांव येथे अप. क्र. ११६/२०२२ कलम ३०२ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी आरोपी स्वप्नील चौधरी हा शोध मोहिमेत मृतक यांच्या भावासोबत होता.

सदर गुन्हयाची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, पो. उपनि अतुल कावळे हे त्यांचे पथकासह घटनास्थळी दाखल झाले गुन्हयाची माहीती घेतली. मयता बाबत बारकाईने माहिती घेवून मुखबीरचे खात्रीशीर खबरे वरून व तांत्रीक तपासाचे आधारे आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आले. आरोपी नामे स्वप्नील दयाकर चौधरी वय १९ वर्षे रा. शेगांव जि. चंद्रपूर यास ताब्यात घेवून त्यास गुन्हयासबंधाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने जुन्या वादावरून त्याचे साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकासह खुनाची कबुली दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. जितेंद बोबडे, संदीप कापडे, मंगेश भोयर, पो. उप. नि. अतुल कावळे, स. फौ. खनके, पो. हवा. संजय आतकुलवार स्वामी चालेकर, प्रकाश बल्की, महोतो, ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार, चंदू नागरे, पो.कॉ. संदीप मुळे, प्रशांत नागोसे, गणेश भोयर, सतिश बगमारे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, प्रमोद कोटनाके, गणेश मोहूर्ले, विनोद जाधव, पो.स्टे. गांव येथील स.पो.नि. अविनाश मेश्राम, स.फौ. किशोर पिरले, अशोक क्षिरसागर, पो.कॉ देवानंद डुकरे, रमेश पाटील यांनी केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Previous articleखळबळजनक :- शेगांव येथील तंटामुक्ती अध्यक्ष महेश घोडमारे यांचा खून.
Next articleमनसे जनहित कक्षाचे राज्य सरचिटणीस जोशी यांचे भद्रावती- चंद्रपूर येथे जंगी स्वागत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here