Home वरोरा खळबळजनक :- शेगांव येथील तंटामुक्ती अध्यक्ष महेश घोडमारे यांचा खून.

खळबळजनक :- शेगांव येथील तंटामुक्ती अध्यक्ष महेश घोडमारे यांचा खून.

आरोपी गावातीलच असल्याची विशेष सूत्रांकडून माहिती. शेगाव परिसरात उसळला संताप.

शेगाव (बू) प्रतिनिधी  :

वरोरा तालुक्यातील शेगाव बू येथील सामाजिक कार्यकर्ता तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महेश बबनराव घोडमारे वय वर्षे ३० याचा अंदाजे दोन दिवसांपूर्वी खूण झाल्याची खळबळजनक माहिती आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उधडकिस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश घोडमारे हे खाजगी क्षेत्रात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला असे विविध कामे करत होता व त्याच व त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान तहसील कार्यालयात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जास्तीचे पैसे घेतल्याचे किंव्हा प्रमाणपत्र मिळाले नसल्याच्या वादावरून त्याचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे, मात्र सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या महेश यांचा खून झाल्याने शेगांव येथे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या तीन ते चार दिवसापासून महेश हा आपल्या कामाकरीता बाहेर गेला होता. तो घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक चौकशी केली शिवाय काल २२ तारखेला त्यांच्या भावाने पोलीस स्टेशन शेगाव येथे माझा भाऊ हरविला असल्याची लेखी तक्रार दिली. पोलीस कर्मचारी देखील आपल्या कामाला लागले, दरम्यान आज सकाळी त्यांच्या भाऊ याने अधिक माहिती घेतली असता त्याचा भाऊ मेसा येथून दुसऱ्याच्या दूचाकी बसून वरोरा येथे रवाना झाला असल्याची माहिती समोर आली. सदर गाडी मेसा समोरील जंगलात उभी असल्याची खात्री काही लोकांनी दिली. यांच्या आधारे घटना स्थळ गाठले असता झुडपात त्याची चप्पल, रक्त, रक्त बांबाळ असलेले लोखंडी रॉड व झुडपा आड प्रेत आढळून आले.

या घटनेची माहिती पोलिसांना देताच येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या ताफ्यासह सर्व कर्मचारी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून सायंकाळ पर्यंत खरे गुन्हेगार समोर येण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here