Home क्राईम स्टोरी पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दीपक बारच्या मालकावर गुन्हे दाखल करा.

पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दीपक बारच्या मालकावर गुन्हे दाखल करा.

डिजिटल मीडिया असोसिएशनची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी. ठाणेदार कोंडावारची कानउघडनी?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर बिअर बार मालकांची दादागिरी मोठया प्रमाणात वाढली असून त्यांच्या बार मध्ये येणाऱ्या ग्राहकांना सुविधा देताना वेटर कमी पडले किव्हा पैशाच्या बाबतीत असमांजस तयार झाला तर स्वतः बार मालक दादागिरी वर उतरून ग्राहकांना शिवीगाळ व मारहान करतात अशी ओरड होत असताना आता पडोली स्थित दीपक बार चे मालकांनी कित्तेक ग्राहकांना अशीच मारहान केल्याची बाब आता उघड झाली असून दिनांक 13 जून ला बार मालक अगदी बार च्या समोर काही ग्राहकांना मारहान करतानाचा प्रकार ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक अनुप यादव यांनी उघडकीस आणण्यासाठी व्हिडीओ शूट केला मात्र आता आपली पत्रकार पोल खोलेल या भीतीने दीपक बार मालकाच्या मुलाने अनुप यादव यांच्या डोक्यावर व इतर ठिकाणी स्टील च्या रॉड ने वार करून गंभीररित्या जखमी केले व त्यांच्याकडील मोबाईल हिसाकावून घेतला,

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक अनुप यादव यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यावेळी साप्ताहिक भूमिपुत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांनी त्यांना जखमी अवस्थेत पडोली पोलीस स्टेशन मध्ये नेले, मात्र रक्ताश्रव जास्त होत असल्याने पोलिसांनी त्यांना अगोदर हॉस्पिटल मध्ये भरती करण्यास सांगितले त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना भरती केले,दरम्यान पोलिसांनी याबाबत दखल घेत वेळीच चौकशी करून आरोपीना ताब्यात घ्यायला हवे होते, मात्र त्यांनी तसें न करता बार मालकांना जणू संरक्षण देऊन या गंभीर घटनेची दखल घेतली नाही त्यामुळे डिजिटल मीडिया असोसिएशन चे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांच्या पुढाकारांने पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार महेश कोंडावार यांची भेट घेऊन आरोपीना अटक करण्याची मागणी केली, परंतु अगोदरच बार मालकांनी ठाणेदाराशी संपर्क साधून प्रकरण दडपण्याची तयारी सुरु केल्याने पोलीस निरीक्षक कोंडावार यांनी उलट पत्रकारांना धमकी दिली की बार मालक तुमच्यावर काऊंटर मधून पैसे काढण्याची किव्हा दारूचे बिल दिले नाही म्हणून तक्रार देईल व त्यामुळे तुम्हाच्यावर पण गुन्हे दाखल होतीलं, त्यावर उपस्थित पत्रकार संतापले व त्यांनी ठाणेदारांना धारेवर धरले की तुम्ही आरोपीची बाजू कशीकाय घेता? तर मग त्यांनी सरावासावर केली.

तब्बल 40 तासानंतर सुद्धा गुन्हे दाखल नाही.

“सदरक्षणाय खलनींग्रहणाय” या पोलीस ब्रीद वाक्याला स्वतः ठाणेदार महेश कोंडावर यांनी फाटा देत चक्क पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची 40 तास लोटून सुद्धा दखल घेतली नाही त्यामुळे डिजिटल मीडियाt असोसिएशन चे पत्रकार व सहकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे यांच्या जागी प्रभारी असणाऱ्या नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली, दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी ठाणेदार कोंडावर यांची चांगलीच कानउघडनी करून धारेवर धरले तेंव्हा कुठे स्वतः ठाणेदार चक्क फिर्यादी अनुप यादव यांच्या घरी येऊन तक्रार घेतली,

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होणार?

पडोली येथील दीपक बार च्या समोर ग्राहकांना मारहान झालेल्या घटनेची व्हिडीओ क्लिप मोबाईल मध्ये होती तो मोबाईल बार मालकांनी हिसकावून घेतल्याने तो डिलीट केला जाऊ शकतो शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय दास्तावेज मध्ये सुद्धा छेडछाड होऊ शकतो अशी चर्चा असल्याने या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना डिजिटल मीडिया असोसिएशन च्या पत्रकारांनी अगोदरच अवगत केले आहे कारण दीपक बार चे मालक हे जिल्ह्यातील बार असोसिएशन चे अध्यक्ष असल्याचे कळते मात्र या आरोपी बार मालकावर जर कलम 307 व इतर कलमसह पत्रकार संरक्षण कायाद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला नाही तर सर्व पत्रकार संघटनाना सोबत घेऊन पोलीस प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.

Previous articleदुर्दैवी :- दिंदोडा गावातील सोहमच्या वीज पडून दुर्दैवी मृत्युने गावकरी हळहळले.
Next articleनंदिनी इरदंडे हिने दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here