Home Breaking News नंदिनी इरदंडे हिने दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

नंदिनी इरदंडे हिने दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

 

 

वरोरा तालुक्यातून 94.40 गुण मिळवून पटकावला चौथा क्रमांक

वरोरा प्रतिनिधी : 

स्थानिक वरोरा शहरातील लोकमान्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेली नंदिनी किरण इरदंडे हिने आपल्या कठोर व नियमित अभ्यासाने वरोरा तालुक्यातून तब्बल 94.40 टक्के मार्क घेऊन चौथा क्रमांक प्राप्त केला आहे, तिच्या या यशाचे गमक विचारले असता तिने तिची आजी श्रीमती रुखमाबाई आई मनीषा व वडील किरण इरदंडे आणि शाळेतील शिक्षक वृंद यांना श्रेय दिले, अथक व जिद्दीने केलेले कुठलेही कार्य हे सफल होऊ शकते याची प्रचिती नंदिनी इरदंडे या विद्यार्थिनीनेदाखवून दिली.

अतिशय नम्र व प्रत्येक कामात आपला हाथकंडा असल्याचे दाखवून देणारी नंदिनी ही अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाणार आहे कारण वेगवेगळ्या पदार्थाची रुचकर रेसिपी अवगत असणारी नंदिनी घरातील इतर कामे पण त्याच तन्मयतेने करत असतें आणि अभ्यासात सुद्धा तिने मेरिट येऊन आपल्या भावी उज्वल शैक्षणिक भविष्याची मुहूर्तमेढ रोवली असल्याने तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here