Home Breaking News धक्कादायक :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेचं बंड घडवून आणलं?

धक्कादायक :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेचं बंड घडवून आणलं?

धक्कादायक :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेचं बंड घडवून आणलं?

उद्धव ठाकरेनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देणं हे काय आहे?

लक्षवेधी :-

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेनेत झालेल्या बंडाळीचा भूकंप सगळीकडे जनतेचे लक्ष वेधत असल्याचे चित्र आहे पण खरोखरच शिवसेनेत एकनाथ शिंदे हे बंड करण्याइतपत सक्षम नेते आहेत का? जे एकनाथ शिंदे काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते ते अचानक काही दिवसातच बंडाचा झेंडा उभारून शिवसेनेला सुरुंग लावेल अशी शक्यता फार कमी आहेत असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे शिवाय एकनाथ शिंदेने बंड केल्यानंतर कट्टर शिवसैनिक असलेले गुलाबाराव पाटील यांनी प्रसारामध्यमाना प्रतिक्रिया देताना म्हटले होते की एकनाथ शिंदे यांची नाराजी असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते येतील असा विश्वास व्यक्त केला होता तेच गुलाबराव पाटील आता त्याच एकनाथ शिंदेच्या खेम्यात ते गुहाटीत जातात म्हणजे हे सगळं चाललंय तरी काय? हे कळायला मार्ग नसून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भाजपाला पुन्हा अजित दादा पवार यांच्या प्रमाणे धोबीपच्छाड देण्याचा हा कार्यक्रम तर नसावा अशी शंका आता राजकीय वर्तुळात चर्चेल्या जात आहे,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकात गुंफलेले आहेत, ते वेगळे होऊ शकत नाहीत, म्हणूनच एकनाथ शिंदे, आदित्य काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाऊन आले, मी बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहे असेही ते म्हणाले व विशेष म्हणजे त्यांना आपण अल्पमातात आहे हे माहित असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की सरकार पडणार नाही म्हणजे कुठेतरी शंकेला वाव असून ज्या पद्धतीने अजित पवार यांनी सकाळी पहाटे भाजपला साथ देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अगदी 24 तासात आपला निर्णय फिरवला अगदी तशीच परिस्थिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची होऊ शकते यामध्ये स्वतः राष्ट्रवादी चे नेते शरद पवार हे सुद्धा सामील असण्याची शक्यता सुद्धा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे एवढे आमदार बंड करण्याच्या तयारीत असताना गुप्तचर यंत्रणा कुठे होती?

मुंबई पोलीस ही भारतातील सर्वात मोठी गुप्तचार यंत्रनेत अग्रेसर असणारी पोलीस यंत्रणा असताना शिवसेनेतील बंडाळीची कल्पना त्यांना नसावी म्हणजे आश्चर्यच आहे कारण ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्याच पक्षाचे आमदार बंड करतात आणि महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जातात ही गोस्ट राजकीय दृष्टीने आश्चर्यकारकच म्हणावी लागेल.

कोण आहेत एकनाथ शिंदे?

एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात छगन भुजबळ यांनी बंडाळी केली त्यावेळी ते बाळासाहेबांनंतर दुसरे सक्षम नेते होते व नारायण राणे यांनी जेंव्हा बंडाळी केली तेंव्हा ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते पण त्यांनी दहा पेक्षा जास्त आमदार फोडले नाही पण आता महाराष्ट्रात ठाणे मुंबई सोडली तर एकनाथ शिंदेचे कुठेही वर्चस्व नसताना ते चक्क तब्बल 37 आमदार फोडून सत्ता स्थापनेच्या भाजप नेत्यांच्या राजकीय विचारांना प्रबळ करतात व इकडे अजूनपावेतो आघाडीतील घटक कांग्रेस राष्ट्रवादी च्या नेत्यांकडून सरकार पडणार अशी शक्यता वर्तवली जात नाही शिवाय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे प्रसारामध्यमातून सांगतात त्यामुळे यामागे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात तर नसावा अशी शंका येत आहे.

Previous articleनंदिनी इरदंडे हिने दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश
Next articleसालोरी गावात ऐन पावसाळ्यात अंधार व रस्ते नाल्यांची दुर्दशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here