Home चंद्रपूर सालोरी गावात ऐन पावसाळ्यात अंधार व रस्ते नाल्यांची दुर्दशा

सालोरी गावात ऐन पावसाळ्यात अंधार व रस्ते नाल्यांची दुर्दशा

सालोरी गावात ऐन पावसाळ्यात अंधार व रस्ते नाल्यांची दुर्दशा

 

सरपंच सचिवांचे जाणीवपूर्ण दुर्लक्ष की बदमाशी? मनसेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांनाकडे निवेदन.

 

सालोरी प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील अनेक गावात पावसाळ्याच्या अगोदर नाल्यांची सफासफाई व रस्त्यांची डागडुजी झाली असल्याने व महावितरण कंपनीने स्ट्रीट लाईट चा विद्युत पुरवठा बद केल्यानंतर सुद्धा बिल भरून गावात अंधार होऊ दिला नसल्याने नागरिकांना समस्या निर्माण झाली नाही मात्र सालोरी हे गाव तालुक्यातील मोठया लोकसंख्या असलेल्या गावापैकी एक असताना व मोठया प्रमाणात टॅक्स वसुली होत असताना गावाच्या मूलभूत समस्या कशा काय निर्माण झाल्या? इतर गावाच्या ग्रामपंचायत तर्फे स्ट्रीट लाईट चे बिल भरले गेले मग सालोरी ग्रामपंचायत मध्ये बिल भरण्यासाठी पण पैसे नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखा कार्यकरणीने गावाच्या या समस्या निराकरण करण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना गावात बोलावून समस्या बाबत अवगत केले व मनसेतर्फे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन सालोरी गावातील रस्ते नाल्या छोटे पूल याची दुरुस्ती व स्ट्रीट लाईट त्वरित सुरु करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. शुभम वाकडे, रंगनाथ पवार, रोहन ढोके, राजू रंधई, प्रशांत ढोके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleधक्कादायक :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेचं बंड घडवून आणलं?
Next articleकृषी वार्ता :- वरोरा तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here