Home वरोरा कृषी वार्ता :- वरोरा तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन.

कृषी वार्ता :- वरोरा तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन.

हजारो शेतकऱ्यांना होणार मार्गदर्शनाचा लाभ कृषी अधिकारी यांचा प्रमुख पुढाकार.

वरोरा न्यूज
किशोर डुकरे:-

शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन करणे व शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यावर मार्गदर्शन करणे या प्रमुख उद्देशातून तालुका कृषी अधिकारी वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जवळपास १५० गावात दिनांक २५ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने शेतकरी प्रशिक्षण, सभा, शेतीशाळा, शिवारफेरी,वेबिनार व प्रात्यक्षिक च्या माध्यमातून परिसरातील प्रगतशील शेतकरी, रिसोर्स फार्मर व शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडत आहेत.

या मोहिमेअंतर्गत *कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा )* अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु मधील खेमजई या गावात आज दि २८ जून रोजी खताचा संतुलित वापर दिन म्हणून *किसान गोष्टी* चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा. तालुका कृषी अधिकारी,वरोरा श्री गजानन भोयर यांनी खताचा योग्य वापर, सूक्ष्ममूलद्रव्ये व त्यांचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री विजय काळे ,मंडळ कृषी अधिकारी शेगाव बु. यांनी जैविक व सेंद्रिय खते, जैविक व सेंद्रिय औषधे यांचा वापर शेतीमध्ये वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच सोयाबीन पिकामध्ये बीज प्रक्रिया, तणनाशकाचा वापर व खतांचा संतुलित वापर, येणारे संभाव्य रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सरपंच सौ.मनिषा चौधरी ,उपसरपंच श्री चंद्रहास मोरे,पोलीस पाटील श्री विश्वनाथ तुराणकर,उमेद चे तालुका समनवयक
श्री अरुण चौधरी , माणिकादेवी आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी, खेमजई चे संचालक श्री भगवंत ननावरे,रमेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास गावातील ५५ ते ६० शेतकरी व उमेद योजनेतील महिला बचत गट उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक कु.लता दुर्गे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक तंत्र व्यवस्थापक कु.मीनल आसेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here