जखमी झालेल्या इतर पाच जणांची प्रक्रुतीची स्थिर प्रशासनाने या आकस्मिक संकटात तात्काळ आर्थिक मदत द्यावी – गावकऱ्यांची मागणी
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यात दिंदोडा या गावातील नुकताच बारावी उतिर्न झालेला विद्यार्थी सोहम हरिभाऊ काळे हा त्याच्या शेतात सरकी टोबन करिता परिवरतिल सदस्यांसह इतर पाच लोकांसोबत शेतात गेला असताना
११/६/२०२२ ला दुपारी २ वाजता अचानक वीज पडून मरण पावला विजेचा हा थरार एवढा भयंकर होता की वादळी पावसात विजेने सहाही जनांना आपल्या चक्रित पकडले दरम्यान एकाचा हाताचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्या हातात स्टील चा रॉड असल्याने विजेचा झटक्यात त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार जनाला दूर फेकून दिले तर सोहम हरिभाऊ काळे वय १८ वर्ष याच्या छातीवर वीज पडली आणि सोहम जागीच ठार झाला. वरून पावसाच्या जोरदार सरी व इकडे सोहम चा झालेला मृत्यु बघून सगळे चक्रावले परंतु अशाही स्थितीत ललित बाबा काळे, नितीन बाबा काळे यांनी बैलबंडी जोपुन सोहम ला घराकडे आणले या वेळी इतर पाच लोकांची प्रक्रुति सुद्धा अस्वस्थ होती त्यामुळे त्या सगळ्याना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. काल झालेल्या सोहम च्या अंत्यसंस्काराच्या वेळी गावातील प्रत्तेक घरचा सदस्य हळहळला व सोहम ला अखेरचा निरोप दिला.
विज पडून सोहम हरिभाऊ काळे मरण पावला त्यात उज्वला हरिभाऊ काळे वय -३८, कार्तिक हरिभाऊ काळे वय -१४, ललित बाबा काळे वय – ३२नितीन बाबा काळे वय २५ शिवम देविदास काळे वय १३ हे जखमी झाले या संकटात अनेकांनी काळे परिवाराचे सांत्वन केले प्रशासनाचे पटवारी व मंडळ अधिकारी प्रत्यक्ष भेटीस आले पण आकस्मिक संकटात प्रशासनाकडून काळे परिवाराला तात्काळ मदत मिळाली नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. काळे परिवारावर आलेले हे अस्मानी संकट बघता त्यांना या संकटात धीर देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी भेट दिली व काळे परिवाराला शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.