Home वरोरा भयंकर :- वरोरा तालुक्यातील कोटबाळा येथे वादळी पावसाने घरांचे छत उडाले.

भयंकर :- वरोरा तालुक्यातील कोटबाळा येथे वादळी पावसाने घरांचे छत उडाले.

पिडीत कमलाबाई नवघरे यांना तहसील प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची गावकऱ्यांची मागणी.

वरोरा प्रतिनिधी ;-

दोन दिवसापूर्वीच्या वादळी पावसाने वरोरा तालुक्यात कहर केला होता त्या वादळी पावसात अनेक गावातील घरांचे छत उडून घरातील सामानाची व अनाजाचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्यांच्यावर ऐन शेतीमधे पेरणीच्या वेळी मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे असाच दुर्दैवी प्रकार वरोरा तालुक्यातील कोटबाळा गावात घडला असून कमलाबाई नवघरे यांच्या घरांच्या टीना अक्षरशा उडत गेल्याने घरातील अन्नधान्यासह इतर मालाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तहसील प्रशासनाने या आपत्कालीन संकटात नवघरे परिवाराला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

तालुक्यातील कोटबाळा हे गाव छोटे असून सद्या शेतात पेरणीचा हंगाम सुरू आहे. पेरणीच्या लगबगीत असे अस्मानी संकट उभे राहिल्याने कमलाबाई नवघरे परिवार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच यांची दखल घेऊन तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here