Home वरोरा स्तुत्य उपक्रम :- लोकसहभागातून साकारले चिनोरा पारधी टोला येथे अभ्यास मंदिर.

स्तुत्य उपक्रम :- लोकसहभागातून साकारले चिनोरा पारधी टोला येथे अभ्यास मंदिर.

तहसीलदार रोशन मकवाने यांनी केले अभ्यास मंदिराचे उद्घाटन.  धर्मेंद्र  शेरकुरे आणि सुनील घोसरे यांचा पुढाकार !

वरोरा प्रतिनिधी -:

समाजात कोण कुठल्या वेळी कुणाच्या जीवनात काय चमत्कार करेल हे सांगता येत नाही मात्र त्यात प्रेरणा महत्वाची आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना वरोरा तालुक्यातील मजरा पारधी टोला येथे घटली असून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात आदिवासी पारधी बांधवांशी संवाद साधला त्यातून प्रेरणा घेत येथील पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र अंकुश शेरकुरे आणि तरुण कार्यकर्ते सुनील घोसरे यांना नव प्रेरणा मिळाली. त्यांनी लोकसहभाग घेत पारधी वस्तीवर बालकांसाठी ज्योतिबा सावित्री अभ्यास मंदिराची सुरुवात केली. चिनोरा गावाजवळ असलेल्या पारधी बेडा येथे जवळपास पावणे तीनशे लोकसंख्या आहे येथील लोक हात मजुरी करून आपला चरितार्थ चालवतात येथील बहुसंख्य पालक शिकलेले नाहीत रोजीरोटीसाठी बाहेर जावे लागत असल्यामुळे शिक्षणाप्रती लोक फारसे जागृत नाहीत बालकांची नावे शाळेत असली तरी अनेकांचा अभ्यास खूपच कच्चा आहे धर्मेंद्र शेरकुरे हे येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा निश्चित झाल्यावर आपल्या बेड्याला 😜त्यांनी भेट द्यावी असा निरोप सुप्रिया ताई ला पाठवला परंतु अत्यंत व्यस्त कार्यक्रमात असताही सुप्रियाताईंनी त्यांच्या गाड्यांचा ताफा नागपूर चंद्रपूर महामार्गावर थांबवत धर्मेंद्र शेरकुरे आणि गावातील नागरिकांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार स्वीकार केला मी पुढच्या वेळेला दौऱ्याच्या वेळी निश्चितच पारधी बेड्यावर येईल असे आश्वासनही त्यांनी दिले सुप्रियाताईंचा भेटीमुळे धर्मेंद्र शेरकुरे आणि गावकऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारली सुप्रिया ताई पुढे येणार त्यामुळे आपल्या वस्तीत आपण काहीतरी उत्तम कार्य केले पाहिजे या प्रेरणेतून त्यांनी बालकांसाठी अभ्यास केंद्र सुरू करण्याचे निश्चित केले धर्मेंद्र शेरकुरे यांनी हा विचार गावकऱ्यांना पुढे बोलून दाखविला येथील युवा कार्यकर्ते दिवाकर नन्नवरे ,सुनील घोसरे यांच्यासह गावकऱ्यांनी हा प्रस्ताव उचलून धरला आपली बालके मागे राहता कामा नये असा विचार करून बालकांचा अभ्यास घेण्याचे ठरले बसण्यासाठी जागा सापडत नव्हती मग हनुमान मंदिराचे अध्यक्ष रवींद्र शेरकुरे यांनी मंदिरांमध्ये अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी दिली ज्योतिबा सावित्री अभ्यास मंदिर हे नाव निश्चित केले आणि गावकरी कामाला लागले.

सेवाभावी शिक्षक दांपत्याने केली मदत,

वरोरा येथील सेवाभावी शिक्षक अरुण उमरे व त्यांच्या पत्नी शारदा अरून उमरे यांनी ज्योतिबा सावित्री अभ्यास मंदिरासाठी शैक्षणिक साहित्य देऊ केले, फळा ,चार्ट , अंकलीपी नोटबुक वह्या पुस्तके पेन खेळाचे साहित्य व इतर शैक्षणिक साहित्य त्यांनी भेट दिले, त्यामुळेच एवढ्या तातडीने हे अभ्यास केंद्र सुरू करता आले अशी भावना धर्मेंद्र शेरकुरे यांनी व्यक्त केली.

अभ्यास मंदिराचे तहसीलदार यांच्या हस्ते उद्घाटन.

उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधींना निमत्रंण दिले परंतु राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नसल्याने तहसीलदार रोशन मकवाने यांना निमंत्रण दिले व त्यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन झाले त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला त्यांना भरपूर अभ्यास करण्याचा मंत्र दिला यावेळी चंद्रपूर येथील भटके विमुक्त जाती जमातीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्रभा ताई चिलके नागपूरचे ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ वासुदेव डहाके आणि वंचित समूहाचे विदर्भ समन्वयक प्रमोद काळबांडे व येवती येथील समाजाचे कार्यकर्ते सुधाकर पवार आदी उपस्थित होते.

चार मुलामुलींनी घेतली शिक्षणाची जबाबदारी.

दीक्षा राजू दडमल या वस्तीतील एकमेव मुलगी एम ए पर्यंत पोहोचली तसेच विशाल दिलीप शेरकुरे हा विज्ञान शाखेत बिए ची अंतिम परीक्षा देत आहे.बारावित नुकतीच ६७.५०टक्के घेऊन उत्तीर्ण झालेली पार्वती अशोक शेरकुरे हि सुद्धा सहायिका असणार आहे, शुभांगी घोसरे, नंदिनी शेरकुरे,निकेश दडमल या मुलांनीही तहसीलदार रोशन मकवाने सोळंके यांचे स्वागत केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here