Home वरोरा कालच्या वादळी पावसाने आसाळा सह अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान.

कालच्या वादळी पावसाने आसाळा सह अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान.

आसाळा येथील जांभूळे परिवार झाले घरापासून पोरके घरातील अनाज पाण्यात.

वरोरा प्रतिनिधी(किशोर डुकरे )

काल झालेल्या वादळी पावसाने वरोरा तालुक्यातील अनेक गावात घरांचे छत उडून मोठे नुकसान झाले असून काही कुटुंबीयांना घरात पाणी शिरल्याने अक्षरशः भर पाण्यात आपला जीव धोक्यात घालून दुसरीकडे आसरा घ्यावा लागला तर काही ठिकाणी घरातील अनाज पूर्णता भिजल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना आसाळा गावात घडली असून जांभूळे परिवाराच्या घराचे छत उडाल्याने व त्यांच्या घरातील अनाज पूर्णता भिजल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

वादळी पावसाने एकीकडे शेतात पेरणी करण्यासाठी शेतकरी आनंदी झाला असला तरी दुसरीकडे अनेक घराचे व गोठ्याचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे या अस्मानी सुलतानी संकटात प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Previous articleभद्रावती तालुक्यातील आष्टी गावात मनसेच्या शाखा फलकांचे उद्घाटन.
Next articleस्तुत्य उपक्रम :- लोकसहभागातून साकारले चिनोरा पारधी टोला येथे अभ्यास मंदिर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here