Home वरोरा भद्रावती तालुक्यातील आष्टी गावात मनसेच्या शाखा फलकांचे उद्घाटन.

भद्रावती तालुक्यातील आष्टी गावात मनसेच्या शाखा फलकांचे उद्घाटन.

वरोरा तालुक्याच्या मनसे संघटन बांधणी नंतर भद्रावती तालुक्यात मनसेची गावागावात शाखा बांधणी सुरू.

भद्रावती :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाव तिथे शाखा ही संकल्पना घेऊन वरोरा भद्रावती तालुक्यात मनसे नेते रमेश राजूरकर जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या पुढाकाराने शाखा बांधणी सुरू असून नुकतीच भद्रावती तालुक्यातील आष्टी गावात मनसेच्या शाखा फलकांचे उद्घाटन मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व तालुका अध्यक्ष रोहित वाभिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी गावागावात पक्षाच्या शाखा असणे आवश्यक आहे. गावपातळीवर नवयुवक अगोदरच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे समर्थक असल्याने मनसे पक्षात नवयुवक मोठ्या प्रमाणात सामील होत आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला मोठी संधी उपलब्ध होईल असा आशावाद मनसे नेते रमेश राजूरकर यांनी व्यक्त केला. यावेळी मनसेच्या सर्व शाखा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleगावागावात पसरला अंधार ,सरपंच बसले उपोषणाला, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ? 
Next articleकालच्या वादळी पावसाने आसाळा सह अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here