Home मुंबई मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींच्या त्या वक्तव्याचा घेतला समाचार.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींच्या त्या वक्तव्याचा घेतला समाचार.

अखेर राज्यपाल कोशारी यांनी मागितली माफी काय म्हणाले कोशारी ? नक्की वाचा

मुंबई कट्टा :

गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोशारी यांचा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला असून उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. अशा शब्दात राज्यपाल कोशारीच्या त्या विधानांचे मानणे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी धिंडवडे काढले.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक पत्र प्रशिद्ध करून कोशारिच्या मराठी माणसाबद्दल व मराठी अस्मितेबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेत म्हटले की आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.असा खणखणीत दम पण राजसाहेब ठाकरे यांनी राज्यपालांना भरला.

राज्यपालांनी मागितली माफी ?

मुंबईबद्दल केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

राजस्थानी आणि मारवाडी लोकांना मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणाच नाही असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक पत्रक प्रशिद्ध करून राज्यपाल कोशारीचा चांगलाच समाचार घेतला होता अर्थात सर्वच पक्षांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. त्यावर राज्यपालांनी आज पदडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Previous articleएसआरके कंपनीच्या चुकीच्या नियोजनाचा सालोरी गावातील शेतकऱ्यांना फटका.
Next articleयेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here