Home वरोरा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढणार!

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढणार!

वरोरा येथे मनसेच्या आढावा बैठकीत मनसे नेते राजूरकर व जिल्हाध्यक्ष दिलीप रामडवार यांची घोषणा.

वरोरा प्रतिनिधी :-

नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात जातिनिहाय रोस्टर जाहीर झाले असून सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. अशातच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रमेश राजूरकर यांच्या नेत्रुत्वात पक्ष बांधणी जोरात सुरू असून येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हापरिषद पंचायत समित्या निवडणुका ताकतीने लढविण्यासाठी संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या संदर्भात पक्षाच्या पदाधिकारी व शाखा अध्यक्षांची बैठक स्नेहनगर अभ्यंकर वार्ड येथील हॉल मधे घेण्यात आली. या बैठकीत मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार. मनसे नेते रमेश राजूरकर. मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,जिल्हा सचिव विनोद सोनटक्के,महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड, जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुडे. जिल्हा सचिव रमाशन्कर तिवारी विजय तुर्क्याल. मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चन्दनखेदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे तर्फे घेण्यात आलेल्या या बैठकीत वरोरा नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात आपआपल्या क्षेत्रात असलेली पक्षाची ताकत व संभावित उमेदवार याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातून आलेल्या शाखा पदाधिकारी यांनी आपला लेखाजोखा दिला तर शहर विभागातील पदाधिकारी यांनी वार्डात असलेली पक्षाला संधी व इतर अडचण याबद्दल आपले मत मांडले. एकूणच शहर व ग्रामीण भागात मनसेची असलेली संघटनात्मक ताकत बघता येणाऱ्या नगरपरिषद व जिल्हापरिषद पंचायत समित्या निवडणुका मनसे स्वबळावर लढणार व जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार असा विश्वास मनसे नेते रमेश राजूरकर यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी व्यक्त केला.यावेळी मनसे महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड, मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले.

ग्रामीण मनसे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केले मनोगत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्रामीण भागात अनेक शाखा असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण होऊन त्यातील हुशार युवक आता भाषण देऊ लागले आहे व आपल्या पक्ष संघटनेला कसे मजबूत करता येईल याचा पण प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे अशाच एका सालोरी येथील पदाधिकारी संदीप मोरे यांनी अभ्यासपूर्ण आपले मनोगत व्यक्त करून येणाऱ्या नव्या मजबूत पक्ष संघटनेचा वारसा पुढे नेण्याचा जणू चंग बांधला असल्याचे त्यांच्या मनोगतातूनदिसत होते.

या बैठकीत मनसे महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी महिला सेनेची कार्यकारणी जाहीर केली यात मनसे महिला सेना शहर अध्यक्षा म्हणून पौर्णिमा शेट्टी, शहर संघटीका म्हणून ज्योती मुंजे तर शहर उपाध्यक्षा म्हणून अनिता वरखडे आणि प्रियंका पेटकर यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने,तालुका सचिव कल्पक ढोरे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार ,मनवीसे संघटक चेतन निकोडे ,महाराष्ट्र सैनिक प्रतीक मुडे विनोद खडसंग,विभाग अध्यक्ष पवन ढोके. राजेंद्र धाबेकर. राम पचभाई. किशोर बदकी,आदित्य डवरे व इतर शाखा पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here