Home चंद्रपूर खळबळजनक :- रागाच्या भरात पतीने पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला?

खळबळजनक :- रागाच्या भरात पतीने पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला?

पत्नीची चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज.

चंद्रपूर प्रतिनिधी ;-

सगळीकडे पती पत्नीचे विवाद हा नित्याचाच भाग बनला आहे मात्र या वादात पत्नीला संपविण्याचा प्रकार हा अंत्यंत दुर्दैवी असतो पण अशा घटना सुद्धा वाढायला लागल्या असून दारुड्या पतीसोबत राहण्यापेक्षा मरण पावलेले बरे, असे म्हणणाऱ्या पत्नीच्या गळ्यावर पतीने चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी सकाळी घडल्याची माहिती हाती आली आहे.

चंद्रपूर येथील गांधी वॉर्डात घडलेल्या या घटनेचा सर्वत्र निषेध होतं असून पोलिसांनी पतीविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. राकेश तुळशीराम चौधरी (३६, रा. बीटीएस प्लॉट) असे अटकेतील पतीचे नाव आहे. तर पत्नी श्वेता जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश चौधरी हा दारू पिऊन नेहमीच पत्नी श्वेताला मारझोड करायचा त्यामुळे श्वेता त्याच्यापासून गांधी वॉर्डात विभक्त राहत होती. मंगळवारी राकेश तिथे गेला आणि श्वेताला घरी चलण्याची गळ घातली. यावेळी दोघांत कडाक्याचा वाद झाला आणि वादाची परिणती जीवघेण्या हल्ल्यात होऊन श्वेताला रुग्णालयात भरती करावे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here