Home राष्ट्रीय लक्षवेधी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी गरिबांची झेंड्याच्या नावाखाली थट्टा ?

लक्षवेधी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी गरिबांची झेंड्याच्या नावाखाली थट्टा ?

इकडे देशाचा स्वाभिमान तर दुसरीकडे जनता महागाईच्या विळख्यात ? हे कसलं स्वातंत्र्य ?

लक्षवेधी :-

देशातील क्रांतिवीरांना अत्याचारी ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी मोठा व प्रदीर्घ लढा द्यावा लागला. त्यावेळी काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या काँग्रेस विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज हर घर तिरंगा अभियानाच्या नावाखाली इव्हेंटबाजी करत आहेत. या इव्हेंटबाजीसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात करण्यात आली. हा स्वातंत्र्यसैनिकांचा व तिरंगा झेंड्याचा अपमान आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाने ज्या पद्धतीने देशात जाहिरात करून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा प्लान तयार केला होता त्यामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांनी सुद्धा आपल्या घरांवर देशाचा झेंडा लावावा यासाठी त्यांनी राशन दुकानातून धान्य घेतांना सोबत 20 रुपयांचा झेंडा घ्यायचं सक्तीचं केलं होतं, शिवाय देशाच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था तसेच औधोगिक संस्थाना आपल्या आस्थापनावर झेंडा लावण्याची शक्ती केल्याची बाब चर्चिल्या जातं आहे. महत्वाची बाब ही आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दरम्यान देशात अतिवृष्टी व महापुरे आली त्यात लाखो शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, कुणाच्या घरात पुराचे पाणी शिरुन घरातील अन्नधान्य व जिवनपयोगी वस्तू वाहून गेले त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले त्यातच सतत पावसामुळे शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या हाताला काम मिळाले नाही त्यामुळे त्यांच्या दैनंदिन खाण्यापिण्याचे त्यांचे वांदे झाले आहे, या दरम्यान शासनाकडून पुरपीडितांना कुठलीही आपत्कालीन आर्थिक मदत मिळाली नाही अर्थात सगळीकडे पूर परिस्थिती व पिकांची झालेली राखरांगोळी यात शेतकरी हवालदिल झाला तर शेतमजुर व कामगार यांच्या हाताला काम नाही म्हणून तो सुद्धा अर्धपोटी राहण्याची वेळ आली असताना आता त्यांना झेंडा घेण्यासाठी 20 रुपये सक्तीने मोजावे लागत आहे ही खऱ्या अर्थाने दुर्भाग्यपूर्ण बाब आहे असेच म्हणावे लागेल.

देशाला जेंव्हा स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा या देशात सुईचेही उत्पादन होत नव्हते. पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली भारताने प्रगतीचे एक-एक शिखर गाठले. भारताला जगात एक प्रगत राष्ट्र म्हणून उभं करण्याचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लालबहादूर शास्त्री,इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही विकासाची कास धरत भारताची यशस्वी वाटचाल केली. पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंह यांनीही विकासाच्या विविध योजना देशात राबविल्या. म्हणून भारत आज एक शक्तीशाली देश म्हणून उभा आहे. देशाच्या पंतप्रधान इंदिरा व राजीव यांची झालेली हत्त्या हा सगळा इतिहास देशाच्या जनतेनी अगदी जवळून बघितला पण कुठेही बडेजाव नाही की आपण केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रकार तत्कालीन पंतप्रधान यांनी कधी केला नाही पण आज देशाची आर्थिक परिस्थिती डामडौल झाली असताना महागाई आपल्या सर्वोच्य स्थानी पोहचली असताना त्यातून देश कसा बाहेर निघेल याचा विचार व यावर उपाययोजना बनविण्यापेक्षा आपण पाकिस्तान व चीन देशाच्या सरकार ला ललकारत आहो हे अत्यंत चुकीचे असून आज देशाला आर्थिक प्रगतीपथावर कसे घेऊन जायचे याचा विचार करणे खरे गरजेचे आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.

किराण्यावर जीएसटी लावून जनतेची लूट?

आज देशात महागाई आपल्या सर्वोच्य स्थानी आहेत तर केंद्र सरकार अग्निपथसारखी योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे दैनंदिन जिवनात आवश्यक अशा किराणा मालावरही जीएसटी लावून केंद्र शासनाने जनतेची लूट चालवली आहे जी अत्यंत खेदजनक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात कुठलाही प्लान तयार असल्याची बाब आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रस्तुत केली नाही त्यामुळे केवळ देशभक्ती दाखवून देशाचा विकास होणार आहे कां ? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. अर्थात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी गरिबांची झेंड्याच्या नावाखाली केंद्र शासनाने थट्टा चालवली असून एकीकडे देशाचा स्वाभिमान जागृत करायचा व दुसरीकडे जनतेला महागाईच्या विळख्यात गुंडाळायचे हे कसलं स्वातंत्र्य ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here