खांबाडा बसस्थानकावर स्वच्छतागृहच नाही,जिल्ह्याचे प्रवेशद्वार नावालाच आरोग्यावर होतो विपरित परिणाम.
खांबाडा प्रतिनिधी :-
देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे पुर्ण झाली आणि ७६ व्या वर्षात पदार्पण करीत असताना संपुर्ण देशात तिन दिवस “हर घर तिरंगा” असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वांतंत्र्य दिनाचा जल्लोष करण्याचे आवाहन भारतातील जनतेला केले व जनतेने सुद्धा प्रतिसाद देत आपल्या आपल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकविला पण इकडे स्वातंत्र्याचा जल्लोष होतं असताना दुसरीकडे मात्र सार्वजनिक ठिकाणी महिलांना साधे स्वच्छतागृह मिळत नसल्याची खंत आहे. महत्वाची बाब म्हणजे चंद्रपूर नागपूर हायवे रस्त्यांवर खांबाडा गावाच्या बसस्थानकावर स्वच्छतागृह नसल्याने महिलांची एक प्रकारे कुचंबणा होतं आहे मग स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या जल्लोशाला महत्व ते काय ? स्वातंत्र्याच्या 75 वर्षात महिलांना साधे स्वच्छतागृह मिळत नसेल तर हा कसला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ? असा प्रश्न उभा राहत आहे.
शासनाने महिलाना पुरुषांच्या बरोबरीचे आरक्षण दिले पण त्याच्या सोयीसुविधेकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केले आहे. विशेषता सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाअभावी महिलाची कुंचबंना होते परिणामी त्याच्या प्रकृतीवर दुरागामी परिणाम होतात असे आरोग्य विभागाचे मत आहे.
चंद्रपूर जिल्हाचे प्रवेशद्वार असेलेल्या खांबाडा गाव नागपुर चंद्रपूर हायवेवर असल्याने येथे येणार्या जाणार्याची संख्या अधिकच असते पण येथेच स्वच्छतागृहाअभावी महिलाना असुविधेचा सामना करावा लागतो ग्रामपंचायतला प्रशासनाने विकासाच्या नावावर लाखो रुपये खर्ची घातले मात्र बसस्थानकावर स्वच्छतागृह बांधू शकले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. खरं तर स्वच्छतागृहअभावी महिलाची होतं असलेली कुचंबना ग्रामपंचायत प्रशासनाला लाजीरवाणी करणारी असून आता ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
राज्यांचे व देशाचे मोठमोठे राजकीय पुढारी या ठिकाणावरून जिल्ह्यात प्रवेश करतात व त्यांच्या स्वागताची तयारी इथूनच होते. तालुकास्तरावरून सुद्धा स्वागतासाठी इथे राजकीय पुढारी व कार्यकर्ते येतात पंण देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाली तरी नेत्याच्या ही गंभीर समस्या कशी का लक्षात येत नाही ?हा खरा प्रश्न असून कित्येकदा बसस्थानकावर उतरणार्या महिला लंघुशंकेसाठी केविलवाण्या जागा शोधतात पण त्यांना कुठेच स्वच्छतागृह दिसत नसल्याने स्थानिक प्रशासनाच्या नावाने त्या शिविशाप देवून निघून जात असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात यावरून आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येईल कां ? या अपेक्षेत महिला असल्याचे चित्र उभे राहत आहे.