Home वरोरा खळबळजनक :- वरोरा नगरपरिषदचे पाच माजी भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर ?

खळबळजनक :- वरोरा नगरपरिषदचे पाच माजी भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर ?

स्थानिक नेत्रुत्व नसल्याने नैराश्यापोटी घेणार निर्णय. राजकीय वर्तुळात खळबळ.

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघात दिवंगत नेते संजय देवतळे यांच्या नंतर भाजपला स्थानिक नेता मिळाला नसल्याने भद्रावती नगरपरिषद मधील तीन नगरसेविका काँग्रेस मधे गेल्या तर आता वरोरा नगरपरिषद च्या पाच माजी भाजप नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश होतं असल्याची खळबळजनक बातमी विशेष सूत्रांकडून मिळाली असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप मधे जिथे इतर पक्षातील नेत्यांचा व नगरसेवकांचा प्रवेश करण्याचे सत्र सुरू असताना भाजप सोडण्याचा विचार त्या पाच नगरसेवकांना कां आला ? व ते पाच नगरसेवक कोण ? हे काही दिवसांतच समोर येणार आहे.

एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेला जय महाराष्ट्र करून तब्बल चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रात शिवसेना जणू संकटात असताना वरोरा शहारात मात्र शिवसेनेचा भाजप ला झटका बसण्याची दाट शक्यात निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. नुकतेच भाजपचे विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सुधीर मुनगंटीवार यांना कैबिनेट मंत्री पद मिळून त्यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अर्थमंत्री म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात वरोरा शहराच्या विकासासाठी मोठा निधी त्यांनी दिलेला होता, मात्र भाजपचे ते पाच नगरसेवक नेमक्या कुठल्या अपेक्षेने शिवसेनेत प्रवेश करत आहे तेच कळायला मार्ग नसून केवळ स्थानिक नेत्रुत्व नसल्याच्या कारणावरून ते पाच नगरसेवक भाजप सोडणार असेल तर भाजप च्या वरिष्ठांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे एवढे मात्र खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here