Home नागपूर माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील”

माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील”

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे खणखणीत उत्तर. नितीन गडकरींना रात्री 12 वाजता फोन.

मुंबई न्यूज नेटवर्क ;-

राज्यातील रस्त्यांची दुर्दशा हा गंभीर प्रश्न असून मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर बोलताना सडकून टीका केली. “मी रात्री १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष द्या,” असं सांगितल्याचं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतो असं नमूद करत आधी राज्यातील रस्ते सुधारायला हवे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

राज्यातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या की “नितीन गडकरी घरी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की वहिनी आजच तुमचं नाव भाषणात घेतलं. मी त्यांना रात्री १२ वाजता फोन करून मुंबई-गोवा रस्त्याकडे बघा, किती खड्डे आहेत, असं सांगितलं होतं. यानंतर नितीन गडकरी यांनी भाषणात माझा उल्लेख केला.”

“आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?”
“माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्र मागासलेलं राज्य नाही. महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्याही बाजूने सोडली तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?” असा सवालही शर्मिला ठाकरेंनी केला.

महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो”

शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, “किमान रस्ते तरी नीट करा. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे झालीत, आता आपण ७५ वर्षे साजरी करत आहोत. महाराष्ट्र राज्य देशाला ४० ते ५० टक्के कर देतो. महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो, मग तुम्ही तुमचं राज्य तर नीट करा.”

माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील”

“आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं,” असंही त्यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here