Home चंद्रपूर निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या येन्सा ग्रामपंचायतचे सरपंच रवि भोयर यांना पदावरून पायउतार...

निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या येन्सा ग्रामपंचायतचे सरपंच रवि भोयर यांना पदावरून पायउतार करा.

वामन दादा काळे यांची पुराव्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. तीन अपत्य भोवनार.

वरोरा प्रतिनिधी :

तालुक्यातील येन्सा या गावाचे सरपंच रवि पंढरी भोयर (वय 48 वर्ष) यांना दोन पत्नी पासून तीन अपत्य असताना त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढली व त्यांनी आपल्या नामनिर्देशन अर्जात फक्त दोन अपत्य असल्याची माहिती भरून तिसरे अपत्य लपवले. शिवाय त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून शासनाच्या निवडणूक लढण्याच्या पात्रता अटी आणि शर्ती याचा भंग केल्याने त्यांना सरपंच व सदस्य पदावरून पायउतार करण्यात यावे अशी मागणी वामन दादा काळे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे, त्यामुळे सरपंच रवि भोयर यांना तीन अपत्य भोवनार असून त्यांच्यावर सरपंच पदावरून पायउतार होण्याची नामुष्की येणार असल्याची शक्यता बळावली आहे.

वरोरा तालुक्यातील येन्सा या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रवि उर्फ पंढरी भोयर यांना वेणू नावाच्या पहिल्या पत्नी पासून रंजीत रवींद्र भोयर (जन्म दिनांक: 19/7/1999) नावाचा मुलगा आहे ज्यांचे नाव येन्सा प्रभाग क्रमांक -1 यादी भाग क्रमांक 83-1 व अणुक्रमांक -96 आहे तर नंदा या दुसऱ्या पत्नी पासून रुपाली ( जन्म दिनांक 24/8/2001) व ममता (जन्म दिनांक :-14/9/2003) नावाच्या दोन मुली आहे. ज्यांची नावे शिधावाटप पत्रिका म्हणजे राशन कार्डवर आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत तीन अपत्य असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येत नाही त्यामुळे रवि पंढरी भोयर यांनी नंदा या दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या ममता या मुलीच्या जन्म दाखल्यावर स्वतःचे नाव रवि ऐवजी रवींद्र व वडिलांचे पंढरी ऐवजी भदुजी नमूद केले जेणेकरून त्यांना निवडणूकीत अपात्र करण्यात येऊ नये. रवि पंढरी भोयर यांच्या दुसऱ्या पत्नी नंदा हिच्या पासून असलेल्या दोन मुलींच्या जन्म दाखल्यावर नावाबाबत भिन्नता असली तरी पत्नी म्हणून नंदा हे नाव दोन्ही दाखल्यावर नमूद आहे व राशन कार्डवर नमूद आहे. त्यामुळे रवि भोयर यांनी नामनिर्देशन अर्जात केवळ दोन अपत्य दाखवले आहे ते चुकीचे व शासन प्रशासनाची दिशाभूल आणि फसवणूक करणारी बाब आहे हे स्पष्ट होत आहे त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व व सरपंच पद रद्द करण्यात यावे अशी मागणी वामन काळे यांनी केली आहे.

सरपंचांनी बालक मंदिरच्या जागेवर केले अतिक्रमण ?

रवि पंढरी भोयर यांचा येन्सा या गावात भंगार खरेदी चा व्यवसाय असून त्यांनी येण्याजाण्याच्या रहदारी रस्त्यांवर भंगार चे समान ठेऊन रस्त्यावरून जाण्यास अडथळा निर्माण केला आहे व येन्सा गावात जुनी जागा ज्या नकाशात बालक मंदिर (1200 वर्ग फूट) म्हणून नमूद आहे त्या सरकारी जागेवर रवि भोयर यांनी अतिक्रमण करून तिथे घर बांधले आहे. त्या जागेवर त्यांचे आजोबा विठू रामा आसुटकर (मुत्य) यांनी सुद्धा तिथे अतिक्रमण केले होते. दरम्यान भोयर यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग करून ती जागा स्वतःच्या नावाने ग्रामपंचायत रेकॉर्ड वर घेतली आहे, एकूणच बेकायदेशीर सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण व नामनिर्देश अर्जात नमूद केलेले दोन अपत्य व प्रत्यक्षात असलेल्या तीन अपत्यांचे जन्म दाखल्याचे पुरावे याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे सरपंच पद व ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी वामन दादा काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत पुराव्यासह दिली आहे. त्यामुळे आता सरपंच रवि भोयर हे राजकीय खेळी करून गावातील विरोधकांना नाहक त्रास देत आहे. दरम्यान जर रवि पंढरी भोयर यांचे सरपंच पद घालवले नाही तर गावातील नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुनील गुडे. जिल्हा उपाध्यक्ष रमेश कालबान्धे वामन काळे. राजेंद्र धाबेकर इत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here