Home Breaking News मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा सुधारित विदर्भ दौरा कसा असेल ?

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा सुधारित विदर्भ दौरा कसा असेल ?

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा सुधारित विदर्भ दौरा कसा असेल ?

विदर्भात मनसेला उभारणी देण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याने महाराष्ट्र सैनिकांत चैतन्य. 

 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला बळकटी देण्यासाठी पक्ष संघटन वाढवलं नाही ही वस्तुस्थिती असली तरी मनसेला विदर्भात चांगली संधी आहे. एकीकडे हिंदुत्वाचा नारा देणारी शिवसेना ठाकरे-शिंदे गटात गटांगळ्या खात आहे तर भाजप सोडली तर इतर पक्षाच्या तुलनेत मनसेला मोठी संधी चालून आली आहे. जर पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी व्यक्तिशः या विदर्भात लक्ष घातले तर शिवसेनेला सक्षम पर्याय व भाजप ला जोरदार टक्कर फक्त मनसेच देऊ शकते ही वस्तुस्थिती आहे आणि नेमका याच परिस्थितीचा फायदा घेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याचे बोलल्या जातं आहे.

 

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसेला विदर्भात उभारी देण्यासाठी व कार्यकत्यांची मोट नव्याने बांधण्यासाठी ‘मिशन विदर्भ’ हाती घेतले आहे. येत्या १८ सप्टेंबर रोजी ते नागपुरात दाखल होणार असून तब्बल ६ दिवस विदर्भात तळ ठोकणार आहेत. राजसाहेब ठाकरे यांच्या दौयाची तयारी करण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आनंद बडवार, बबलू पाटील, राजू उबरकर ही पाच सदस्सीय टीम नागपुरात येईल, तीनही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकायाशी चर्चा करून नियोजन केले जाणार आहे. दरम्यान राजसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याने विदर्भातील कार्यकर्त्यांत नवचैत्यन्य निर्माण झाले आहे.

 

नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीन महापालिकांवर मनसेचे विशेष फोकस केले जाणार असून या तीन शहरांत राजसाहेब ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या बैठका व व्यक्तिगत भेटीगाठी घेणार आहेत. राजसाहेब ठाकरे यांच्या या प्रस्तावित दौन्याची तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी नागपुरात येत रवी भवनची पाहणी केली. राज यांच्यासाठी रवी भवन येथील ९ नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आला आहे. राजसाहेब ठाकरे हे १८, १९ सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असतील, त्यानंतर २० रोजी चंद्रपूर येथे मुक्काम असेल. २१ आणि २२ रोजी ते अमरावती येथे मुक्कामी असतील. २३ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वेने मुंबईला रवाना होतील.

Previous articleमनसे वार्ता :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा सुधारित विदर्भ दौरा कसा असेल ?
Next articleचिंताजनक:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महमंडळाच्या चंद्रपूर आगारात पुर्णवेळ आगार व्यवस्थापकच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here