Home Breaking News DNR ( डी. एन. आर. ) ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी,खाजगी ट्रॅव्हल्स मालक,...

DNR ( डी. एन. आर. ) ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी,खाजगी ट्रॅव्हल्स मालक, चालक, वाहक आणि व्यवस्थापक विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल.

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  पुणे येथून डी. एन. आर. खाजगी ट्रॅव्हल्स ने एक महिला आपल्या परिवार बरोबर चंद्रपूरला DNR खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाल्या होत्या. DNR खाजगी ट्रॅव्हल्स ने बरोबर घेतलेली साहित्य ट्रॅव्हल्सची सर्विसेसवर अगर्जीपणामुळे क्रमांक 8 च्या बॅगमध्ये किमान अंदाजे एक लक्ष रुपयाचे DNR खाजगी ट्रॅव्हल्स मधूनच चोरीला गेल्याचे घटना सामोर आली आहे. त्यामुळे काळजीच्या सुरक्षा बाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे येथून चंद्रपूरला DNR (डी. एन. आर.) खाजगी ट्रॅव्हल्स ने रात्रो 10:30 वाजता पुणे ते चंद्रपूर प्रवासाची क्रमांक 7 व 8 तिकीटे बुक करून दिनांक 30/04/2023 ला पुणे वरून दोन बॅग घेऊन प्रवास सुरू केला व चंद्रपूरला दिनांक. 01/05/2023 रोजी सकाळी 10:30 वाजता पोहोचली. महिला आपल्या परिवार बरोबर सोबत तीन मुले ( अपत्य ) सुद्धा होती. चंद्रपूर येथे पोहोचल्यानंतर टोकन क्रमांक. 7 व 8 त्यांना देऊन त्या क्रमांकाची बॅग परत मागितली असता क्रमांक 7 ची बॅग परत दिली आणि 8 ची बॅग दिलीच नाही

क्रमांक 8 च्या बॅगमध्ये किमान अंदाजे एक लक्ष रुपयाचे साहित्य होते. ( स्वतः व अपत्यांचे कपडे, लग्नकार्यालयात द्यायचे कपडे आणि नेकलेस ) त्यांनी पुणे येथून चंद्रपूर येथे लग्न कार्यक्रमात (लग्नाचा स्वागत समारोह बल्लारपूर येथे होता ) सम्मिलित होण्यासाठी प्रवास केला होता. सौ. पायल अशोक गांधी वय ( 34 ) रा. शिरोड जिल्हा: पुणे हुडको कॉलणी शिरोड यांनी चालक, वाहक आणि व्यवस्थापक यांना जेव्हा त्यांच्या कार्यालयात बसून बॅग मागितली. परंतु त्यांनी फार वेळ बसवून ठेवून त्यांचे सोबत अपशब्द बोलले व रुपये 10000/- नगदी घेऊन, परत जा असे म्हटले. नंतर सौ. पायल अशोक गांधी यांनी त्यांना म्हटले की, मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार आहे. तेव्हा त्यांनी तुमच्या तर्फे जे होते ते करा. पोलीस काय करते ते आम्ही बघून घेऊ DNR खाजगी ट्रॅव्हल्स तर्फे  त्रासून दिनांक. 02/05/2023 रोजी DNR खाजगी ट्रॅव्हल्स मालक, चालक, वाहक आणि व्यवस्थापक ह्या चार व्यक्तीची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here