स्थानिक शासकीय व खाजगी बांधकामात अवैध रेतीचा वापर? महसूल प्रशासन निद्रेत ?
सावली प्रतिनिधी ;-
जिल्ह्यात जेमतेम रेती घाटांचे लिलाव झाले असले तरी सावली तालुक्यात अगोदरच अवैध रेतीचा वापर स्थानिक शासकीय व खाजगी बांधकामात मोठ्या प्रमाणांत सुरू आहेत दरम्यान या परिसरातील काही रेती माफिया यांचा संपर्क आंतरराज्य रेती माफियां सोबत असल्याच्या चर्चा असल्याने आता या ठिकाणी आंतरराज्य रेती तस्कर सक्रिय झाल्याचे स्पष्ट होतं आहे. या परिसरातील रेती तस्कर यांची स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांचेशी साठगांठ असल्याची माहिती असून त्यांच्याचआशीर्वादाने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जातं असल्याने जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात त्वरीत चौकशी करावीअशी मागणी होतं आहे.
सावली तालुक्यात शासकीय इमारती व विविध शासकीय कामे प्रगतीपथावर आहे त्यात अवैध रेती चा वापर होतं असल्याने महसूल प्रशासनाचे अधिकारी या अवैध रेती प्रकरणात सामील आहे का? हा प्रश्न उपस्थित होतं आहे. या परिसरात आता रेती घाट लिलाव झाले परंतु त्या रेती घाटातून रेती चा उपसा करतांना व रेती वाहतूक करतांना शासनाच्या नियम व अटी शर्तीचे तीनतेरा वाजवले जातं आहे अर्थात महसूल विभागाचा या अवैध रेती उत्खनन व रेती चोरी प्रकरणात छुपा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. यामुळे या अवैध रेती चोरी प्रकरणी प्रशासनाने त्वरित प्रतिबंध लावावा अन्यथा या रेती चोरी प्रकरणात स्थानिक नागरिकांना घेऊन एक मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा सामाजिक संघटनाच्या वतीने देण्यात येत आहे.