आंध्र प्रदेश : जुन्या काळात लोकांना मौल्यवान वस्तू लपून
ठेवण्याचा छंद होता. आधी बँकेच्या सुविधा नसल्यामुळे लोक पैसा, संपत्ती एखाद्या पेटीत, भांड्यात किंवा जमिनीत पुरत असत. अनेक वर्षांनंतर जेव्हा असा खजिना हाती लागला तर एखाद्याची चांदीच होईल. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशमध्ये समोर आला आहे. इथे घराचं काम सुरू असताना लोकांना जमिनीखाली एक जुनी भलीमोठी पेटी आढळली. ही पेटी सापडताच अख्ख्या गावात याचा बोभाटा झाला आणि सगळ्यांनी ही पेटी पाहण्यासाठी एकच गर्दी केली.सगळ्यात विशेष म्हणजे पेटी हाती लागताच खजिनाच्या लालचेपोटी लोकांनी या पेटीवर आपली असल्याचा दावाही केली. पण जेव्हा पेटी उघडून पाहिली तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमिन सरकली. आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यामध्ये करिवेमुला नावाचं गाव आहे. इथे एक जून घर मोडकळीस आलं होतं. करिवेमुला इथं राहणाऱ्या नरसिमहुलू यांनी हे घर कृष्णा रेड्डी (Krishna Reddy) यांच्याकडून विकत घेतलं होतं. घर जूनं झालं असल्याने त्यांनी घर तोडून नवीन बनवायचं ठरवलं. घराचं खोदकाम सुरू असताना कामगारांना जमिनीत पुरलेली एक लोखंडाची पेटी हाती लागली. या पेटीचं वजन इतकं होतं की ती उचलण्यासाठी ५-६ लोकांची गरज लागलीपेटी सापडल्यामुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय…
अशा पद्धतीने प्राचिन आणि जुनी पेटी जमिनीच्या आत सापडणं हे काही पहिल्यांदाच घडलं नाही आहे. लोकांना माहिती होतं की अशा पेट्यांमध्ये शक्यतो सोनं-चांदी, हिरे- मोती किंवा मोठा खजिना सापडू शकतो. त्यामुळे सगळ्या लोकांची उत्सुकता वाढली होती. लोकांनी त्याला उघडण्याचा खूप वेळ प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. पेटी खूप जुनी असल्यामुळे ती घट्ट झाली होती. या पेटीवर देवी लक्ष्मीचा फोटो होता.पेटीच्या आतमध्ये काय निघालं?
कृष्णा रेड्डी यांच्यासह अनेकांनी या पेटीला खोलण्याचा प्रयत्न केला पण पेटी काही उघडी नाही. अखेर २ दिवसांनी पोलीस आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही पेटी उघडली. जेव्हा ही पेटी उघडली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला आणि सगळी उत्सुकता पाण्यात गेली. कारण, या पेटीमध्ये कोणतीही संपत्ती किंवा खजिना हाती लागला नाही. तर यामध्ये जुनी कागदपत्रं, माती आणि कचरा पडला होता. जे कागद हाती लागले तेदेखील काही कामाचे राहिले नव्हते. खरंतर, ही पेटी उघडण्याआधी जितकी चर्चा या पेटीची झाली ती उघडल्यानंतर लोकांनी तितकाच रागही व्यक्त केला.