अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- दिनांक 25 जुलै ला शहरातील नांदगाव पोडे येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात अज्ञातांनी प्रवेश करीत शाळेतील 32 इंच l,E,D टीव्ही चोरून नेली होती. याबाबत प्राचार्य गोपाल बोबडे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यावर शहर पोलिसांनी 2 आरोपीना अटक केली.चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी गुन्हेगारी फोफावत आहे, त्यावर आळा घालण्यासाठी शहर पोलिसांची चमू गुन्हेगारांवर नजर ठेवून आहे.25 जुलै ला नांदगाव पोडे येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी प्रवेश करीत क्लास मध्ये असलेली 32 इंच l,E,D टीव्ही चोरून नेली, याबाबत शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता गोपनीय बातमीदाराने माहिती मिळाली की 2 युवक l,E,D टीव्ही विकण्याची चर्चा करीत आहे, सदर माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने 2 युवकांना ताब्यात घेत चौकशी केली असता वानखेडे विद्यालयातील टीव्ही त्यांनी चोरून नेल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे टीव्ही चोरल्यावर W C l च्या क्वार्टर मध्ये लपवून ठेवली होती.
पोलिसांनी आरोपी लालपेठ कॉलरी भागात राहणारे 22 वर्षीय कमलेश विठ्ठल ठमके व 21 वर्षीय सिद्धार्थ उर्फ गोरखा श्याम कुमार भारती यांना अटक केली.सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश राजपूत, गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि मंगेश भोंगाडे, पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी केली.