या कांदा घोटाळ्यात आणखी किती बळी जातील याचीच जोरदार चर्चा. व्यापारी भ्रष्ट राजकीय नेते व काही कर्मचारी रडारवर.
वरोरा प्रतिनिधी -:
वरोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेला कांदा घोटाळा हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजला असताना यामध्ये कुणाकुणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, दरम्यान चौकशीच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर या प्रकरणातील कर्मचारी अधिकारी व व्यापारी यांच्या छातीत धडधड सुरू होती, कारण बोगस कांदा उत्पादक शेतकरी दाखवून तब्बल २ कोटी ३० लाख ७३ हजार रुपयांचे शासकीय अनुदान लाटल्याप्रकरणी पणन संचालनालयाकडे अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तक्रारी केल्या होत्या व त्यात सचिव चंद्रसेन शिंदे यांच्यावर निलंबनांची टांगती तलवार होती, अखेर या प्रकरणी पणन संचालनालयाने दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांना सचिव चंद्रसेन शिंदे यांना निलंबित करण्यासंदर्भात ठराव घेण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने संचालक मंडळाने बुधवार दि. १७ जानेवारी रोजी घेतलेल्या तातडीच्या सभेत सचिव चंद्रसेन शिंदे यांना निलंबित करण्याचा ठराव बिनविरोध पारित केला, यावेळी १७ पैकी १६ संचालक उपस्थित होते.
वरोरा तालुक्यात नाममात्र कांदा उत्पादक शेतकरी असताना शासनाने कांदा उत्पादकांना मार्च २०२३ मध्ये प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर होताच बोगस कांदा उत्पादक शेतकरी दाखवून २ कोटी ३० लाख ७३ हजार रुपयांचे अनुदान कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आले. सदर कांदा घोटाळा तेंव्हा उघडकीस आला जेंव्हा कांदा व्यापारी यांनी एका शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले त्यात त्यांचा हिस्सा मागितला, दरम्यान प्रसारमाध्यमांनी याबाबत मोठा आवाज उचलला, या संदर्भात जी माहिती चर्चेत होती त्यात व्यापाऱ्याकडून काही संचालक व राजकीय नेत्यानी पैसे पण उखळले आणि काही ऑडिओ क्लिप व्हायरलं होऊन बाजार समिती मधील कोण कोण सामील आहे त्यावरचा पर्दा उठला दरम्यान पणन महासंचानालयांकडे झालेल्या तक्रारी वरून प्रथम सचिव शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली असली तरी यामध्ये अनेक राजकीय मंडळी जी या प्रकरणात स्वतः लाभार्थी आहे व काही राजकीय नेत्यानी प्रकरण दाबण्यासाठी पैसे पण घेतले आहे त्यामुळे व्यापारी बाजार समिती कर्मचारी व ते राजकीय नेते यांची पोलखोल लवकरच होण्याची शक्यता वाढली आहे.
कांदा कुणाचा करणार वांदा?
काही दिवसापूर्वी कांदा घोटाळा हा प्रशासकीय चौकशीत अडकला जरी होता पण तो व्हाट्सअप ग्रुपवर खूपच गाजत होता, अनेकांची मतमतांतरे तिथे मांडण्यात आली होती व यामध्ये कोण कोण सामील आहेत याच्या जणू दांतकथा रंगू लागल्या होत्या, दरम्यान याच व्हाट्सअप ग्रुपवर काही ऑडिओ क्लिप कांदा घोटाळ्याची साक्ष देत होत्या, आता त्यावरचा पर्दा उठला असून चौकशीत ते कोण कोण आरोपी आहेत याची पुष्टी होणार आहे. त्यामुळे कांदा घोटाळा कुणाचा वांदा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.