Home राष्ट्रीय लक्षवेधी:- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ईव्हीएम प्रश्नावर फडणवीसचा संताप का ?

लक्षवेधी:- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ईव्हीएम प्रश्नावर फडणवीसचा संताप का ?

सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमचा विरोध करत असताना भाजपला ती का हवी ? ईव्हीएम मध्ये काय दडलय ?

भाजप ला मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भीती का?

लक्षवेधी :-

देशात आणि राज्यात ज्या पद्धतीनं सरकारचं कामकाज सुरू आहे तें येणाऱ्या काही वर्षात देशाला गुलामगिरीकडे नेणारी एक भयानक स्थिती दर्शवित असुन जर 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर पुढची अनेक वर्ष देशात निवडणुका होणार नाही, देशात ज्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी आली आणि देशात इंग्रज राजवट सुरु होऊन देश पारतंत्र्यात गेला त्याच पद्धतीन मोदी अडाणी अंबानी यांच्या कंपन्यांकडे देशाच्या प्रापर्ट्या देऊन देश गुलाम बनवेल अशी विचारवंतांची भविष्यवाणी आहे आणि ज्याअर्थी देशातील सर्व समाज भाजपा सरकार च्या विरोधात असताना भाजप “अबकी बार चारसो पार” चा जो नारा देत आहे तर एवढा आत्मविश्वास यांच्याकडे येतो कुठून? असा प्रश्न पडतो, याचे कारण तें ईव्हीएमच्या माध्यमातून येणारी लोकसभा जिंकेल असा कयास लावल्या जातं आहे. त्यामुळं भाजप पक्ष ईव्हीएमवर निवडणूक घेण्यासाठी उतावीळ आहे व बनावट निकाल लावून भाजप जिंकण्याच्या तयारीत आहे म्हणून सर्व राजकीय पक्षाची नेते मंडळी ईव्हीएमच्या विरोधात आहे, अशातच आता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने भाजप नेते फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ईव्हीएमवरील आक्षेपावर टिका केली आहे जी कुठेतरी भाजप च्या जिव्हारी लागली असल्याचे प्रतीक आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असताना मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडून विविध मतदारसंघांचा आढावा घेत कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच राजसाहेब ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे अगोदरच टिआरपी मध्ये महाराष्ट्रात अव्वल असणारे व “लाव रे तो व्हीडिओ” म्हणून भाजप च्या ध्येय धोरणाचे पंचनामे करून भाजप ला सळो की पळो करून सोडणारे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ईव्हीएमवर केलेले भाष्य भाजप च्या जिव्हारी लागले आहे व यावर देवेंद्र फडणवीस यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या भाष्यावर टिका केली आहे जे अत्यंत दुर्दवी आणि भाजप ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकून येते यांची पुष्टी करणारी बाब ठरत आहे.

जगभर मतदान शिक्क्यावर होत असेल, जगभरातील पुढारलेल्या देशांमध्ये तशा प्रकारचे मतदान होत असेल, तर आपणच का व्होटिंग मशीन घेऊन बसलो आहोत. बटण दाबल्यावर कळतच नाही की, मतदान झाले आहे की नाही ते. फक्त एक छोटासा आवाज येतो. यापलीकडे काही होत नाही. मी ज्याला मतदान केले आहे, त्याला ते मिळाले का? मध्यंतरी काहीतरी काढले होते की, मतदान झाल्यानंतर स्लीप येणार, असे राजसाहेब ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. यावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली.पत्रकारांनी राजसाहेब ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत सूचक भाष्य केले. याआधी मागे त्यांना ईव्हीएम पटले होते. आता पुन्हा पटत नाही. पुन्हा पटेल, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, वरती केंद्रात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरू आहे ते चूकच आहे आणि फक्त आजच्यापुरता विचार करून ईव्हीएमच्या माध्यमातून लोकसभा जिंकण्याचा भाजप चा डाव असल्याचे भाजप नेत्यांच्या विधानावरून समजते.

दिल्लीत ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाची प्रसारमाध्यमांतून दखल का नाही ?

एकेकाळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षात असताना ईव्हीएमला विरोध करत होते व जगभरातील लोक ईव्हीएमचा वापर करत नाही तर बायलट पेपरवर मतदान घेते तर भारतात ईव्हीएमचा वापर का ? असा प्रश्न केला होता आता तीच ईव्हीएम भाजप च्या सत्तेची पर्वणी ठरत असल्याने तें ईव्हीएमचा वापर करण्यावर ठाम आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा विरोध दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाद्वारे होत॑ असताना या आंदोलनाची दखल प्रसारमाध्यमे का घेत नाही ? हा गंभीर प्रश्न असुन सर्व प्रसारमाध्यमांना भाजप ने आपल्या दावणीला बांधले आहे, त्यामुळे भाजप नेते फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राजसाहेब ठाकरे यांच्या स्पष्ट वक्तव्यावर आक्षेप नोंदवून ईव्हीएमवरचे भाष्य खोटे ठरवले. याचा अर्थ भाजप ची सत्ता स्थापन करण्याची ईव्हीएम गॅरंटी ठरली असल्याचे बोलल्या जातं आहे.

भाजपला मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यापासून भीती का ?

देशाच्या राजकीय क्षितिजावरून मोदी शहा यांना हटवा अन्यथा हे देश बर्बाद करतील असे सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा न करता तब्बल 10 जाहीर सभा घेणारे व मतदारांना कळकळीने आवाहन करणारे राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजपची पुरती वाट लागली होती व भाजप राजसाहेब ठाकरे यांची भीती बाळगुन होते, दरम्यान 2019 मध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या सभामुळे देशात मोदी विरोधात लॉट तयार झाली होती परंतु तरीही भाजप ने डाव खेळला आणि evm सेट करून व evm ची अदलाबदली करून भाजप अनपेक्षितपणे देशात निवडून आली, जेंव्हा लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला तेंव्हा यावर प्रतिक्रिया देतांना राजसाहेब ठाकरे म्हणाले होते की “अनाकलनिय निकाल”

भाजपला evm चा हट्टाहास का?

भाजपला देशात आपलं एकाधिकारशाहीच राज्य प्रस्तापित करायचं आहे त्यामुळे देशात सर्वत्र आपलीच सत्ता असावी असा त्यांचा प्लान आहे, दरम्यान सन 2017 साली निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या 19 लाख evm मशीन गायब झाल्या होत्या त्याची साधी चौकशी पण भाजप सरकारने केली नाही कारण त्या सर्वevm भाजप च्या गोडाऊन मध्ये सर्वत्र ठेवण्यात आल्या आणि निवडणुकीत त्याचा वापर evm अदलाबदली करिता ठेवण्यात आल्या आहे. याचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे, एरवी निवडणूक आयोग मतदान झाल्यानंतर मशीन ह्या जिल्हास्थरावर शासकीय कार्यालयात ठेवत होते व शासकीय सुरक्षा यंत्रणा असायची पण सन 2019 च्या निवडणुकीत देशात सर्वच लोकसभा क्षेत्रात evm मशीन ह्या शहराबाहेर गोडाऊन मध्ये ठेवण्याची तरतुद करण्यात आली जेणेकरून evm मशीन chi अदलाबदली केल्या जाईल व भाजपला जिंकण्यात मदत होईल आणि नेमकं तसंच घडलं, नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजप मध्यप्रदेश छत्तीसगढ व राजस्थान येथे हरणार हे स्वतः गोदी मीडियाचे सर्व्हे सांगत होते मात्र तिथे मोठया प्रमाणात evm ची हेराफेरी झाली आणि भाजप निवडून आली, हा निकाल लोकांचा पचणी पडला नाही आणि आता सुद्धा मोदी विरोधात देशात वातावरण असतांना अबकी बार चारसो पार चा नारा देण्यात येत आहे तो evm च्या भरोशावर आहे आणि म्हणून evm बद्दल कुणी बोललं तर भाजप नेते संताप व्यक्त करतात कारण त्यांची सत्ता evm च्या माध्यमातून निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here