Home वरोरा उत्सव :- वरोरा येथील सेंट मेरी गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सवात झाला...

उत्सव :- वरोरा येथील सेंट मेरी गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सवात झाला साजरा.

विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्य दिलेल्या भाषणानी आणि त्यांनी गायलेल्या देशभक्तिपर गाण्यानी पालक भारावले.

वरोरा :-

स्वातंत्र्याचा उत्सव देशात सर्वत्र मोठया हर्ष उल्हासात साजरा केला जातो त्यात विशेष करून शाळेत साजरा केलेला उत्सव कायम स्मरणात राहत असतो, कारण या छोट्या मुलांना देशाच्या स्वातंत्र्याचं महत्व आणि त्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या महापुरुषांनी केलेलं बलिदान यापासून प्रेरणा मिळतं असतें अशाच भावुक वातावरणात वरोरा येथील सेंट मेरी गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा साप्ताहिक भूमिपुत्राची हाक वर्तमानपत्राचे संपादक राजू कुकडे उपस्थित होते.

सेंट मेरी गुरुकुलच्या मुख्याध्यापक अरुणा मानकर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले राजू कुकडे यांनी ध्वजारोहन केले व राष्ट्रगीतानी ध्वजाला सॅल्यूट व अभिवादन करून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अतिशय भावनिक वातावरणात देशाच्या स्वातंत्र्याचा हा उत्सव मनविण्यात आला, विद्यार्थ्यांच्या गायन व भाषनांनी पालक वर्ग भावुक झाले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अरुणा मानकर यांच्यासह कृष्णा ढेंगळे, सुजाता ढवळे, निर्मला तिवारी, पूनम नकबे, प्रीती ठाकरे, प्रतीक्षा भोयर, नेहा घोडीले, जेरुषा नाथर, कल्याणी कुरेकर व रेखा शेंडे इत्यादी सहाय्यक शिक्षिकांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here