Home महाराष्ट्र मनसे इम्पॅक्ट:- अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्याने राज्य सरकार घाबरले?

मनसे इम्पॅक्ट:- अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्याने राज्य सरकार घाबरले?

पहिली ते चौथी पर्यंतच्या शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय झाला रद्द, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा.

न्यूज नेटवर्क:-

राज्यात महागाई बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या सारखे ज्वलंत मुद्दे आ वासून उभे असतांना त्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी राज्य सरकारने कुटणिती खेळून राज्य सरकारने शिक्षण आराखड्यात तृतीय भाषा म्हणून इयत्ता पहिली ते चौथीसाठी हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे असा शासन निर्णय काढला होता. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालू देणारं नाही हा इशारा देऊन आम्ही हिंदू आहो पण हिंदी नाही ही टॅग लाईन वापरून संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिकांना याचा विरोध करण्याचे आवाहन केले होते व त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन करून सरकारच्या हिंदी सक्तीचा विरोध केला होता, या दरम्यान मराठी साहित्यिक, मराठी कलाकार व शैक्षणिक क्षेत्रातून सतत होत असलेल्या टीकेनंतर हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट करून याबाबतची घोषणा त्यानी केली आहे. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेचे अभिनंदन केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली यासाठी तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून अभिनंदन. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती, असा टोला सरकारला लगावला आहे.

ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केले पण ते करताना कधी दुस-या प्रांतावर मराठी लादली नाही, त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं? असा प्रश्न त्यांनी केला. असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोक उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

असा दिला राज यांनी इशारा.

मराठी माणूस जर भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे. यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे. सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आले. पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही, महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी इशारा देखील दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here