गंभीर जखमी वामन ठाकरे रुग्णालयात तर आरोपी रमेश इंगोले सुद्धा अटकेच्या भीतीने विष पिल्याचा बनाव करून रुग्णालयात?
वरोरा:-
अगदी शुल्लक कारणावरून संशयाच्या भुताने झपटलेल्या रमेश इंगोले यांनी दिनांक 24 जून ला सकाळी 7.00 च्या दरम्यान वामन ठाकरे यांना तुझ्यासोबत काही बोलायचे आहें असे म्हणून जवळ बोलावले आणि तु माझी इज्जत घालवली असे म्हणत हातात असलेल्या लोखंडी रॉडने अगोदर कंबरेत वार केला आणि खाली पडल्यांनंतर मग डोक्यावर छातीवर वार करून वामन ठाकरे यांना गंभीर जखमी करून तो फरार झाला, हा खुनी थरार काही लोकांनी बघितला पण कुणीही गेले नाही, जेंव्हा जखमी वामन ठाकरे यांचे घरी ही माहिती गेली असता प्रमोद याला झोपेतून आईने उठवले आणि तुझ्या वडिलांला कुणीतरी मारले असे सांगितले असता तो घटनास्थळी गेला, दरम्यान आता आपल्याला पोलीस पकडून नेतील व चोप देईल या भीतीने रमेश इंगोले यांनी स्वतः विष तोंडाला लावून ते विष पिल्याचा बनाव केला आणि रुग्णालयात भरती झाला असल्याचे गावाकऱ्यांचे म्हणणे आहें.
जखमी अवस्थेत वामन ठाकरे यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता तिथून त्यांना चंद्रपूर तेथील डॉ. चेपूरवार यांच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहें. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होतं आहें, मात्र विष पिल्याचा बनाव करणाऱ्या रमेश इंगोले यांची संशयची विकृत मानसिक स्थिती कधी कुणाचा जीव घेईल याचा अंदाज नसल्याने त्यांचेवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी गावातील नागरिकांकडून मागणी होतं आहें.