Home वरोरा दुर्दैवी :- टेमुर्डा खांबाडा परिसरात वीज पडून दोन शेतकरी शेतमजुराचा मृत्यू.

दुर्दैवी :- टेमुर्डा खांबाडा परिसरात वीज पडून दोन शेतकरी शेतमजुराचा मृत्यू.

एकाचा कोसरसार -मकसुर शिवारात तर दुसऱ्याचा बोरगावं शिवनफळ च्या नांद्रा शेतशिवारात मृत्यू.

वरोरा-टेमूर्डा,प्रतिनिधी (धनराज मा बाटबरवे) :-

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा खांबाडा शेतशिवारात वीज पडून दोन शेतकरी शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याchi घटना आज घडली असून कदाचित देवाचा प्रकोप असावा आणि त्यात बिचारे शेतकरी शेतमजूर सापडले असावे अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहें दरम्यान हा नैसर्गिक प्रकोपात सापडलेल्या मृतकांच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होतं आहें.

कोसरसार- मकसूर शेतशिवारात वीज पडून रावबा दादाजी मंगाम (वय४५) या शेतमजुराचा दुदैंव मृत्यू झाला .दुपारी १.३०.वाजेच्या सुमारास रावबा मंगाम हे शेतात पराटी खुरपण्याचे काम करत असताना आकाशात अचानक विजांच्या गडगडाट सुरू झाला. दरम्यान सुरक्षेसाठी त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाखाली आसरा घेतला. मात्र दुदैंवाने त्याच झाडावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, दुसरीकडे बोरगावं शिवनफळं येथे राहणाऱ्या व नांद्रा शेतशिवारात शेतात काम करणाऱ्या अशोक सदाशिव मोरे यांचा वीज पडून मृत्यू झाला, या दोनही व्यक्तीचा वीज पडून एकाच दिवशी पण वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होतं आहें

या दोनही घटनेची माहिती मिळतात शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंग यादव यांनी पथक पाठवून घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले, मृतक रावबा मंगाम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे तर अशोक सदाशिव मोरे यांच्या पच्छात पत्नी व दोन मुले आहेत, या दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर पडला असून त्यांना दुःखद अंतकरणाने गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला, दरम्यान या दोन्ही परिवारातील सदस्यांना सरकार तर्फे तात्काळ मदत मिळावी यासाठी स्थानिक ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटील आणि राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशी मागणी होतं आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here