वरोरा येथे स्थलांतरण होणारी बैंक ऑफ महाराष्ट्र टेमुर्डा शाखा लवकरच गावातच नव्या इमारतीत सुरु होणार असल्याने तूर्तास आंदोलन पुढे ढकलले. मात्र निर्णय फिरल्यास ग्राहकांचे पुन्हा होणार रस्तारोको होणार.
वरोरा (धनराज बाटबरवे):-
वरोरा तालुक्यातील ग्रामीण स्तरावर टेंभुर्डा बाजारपेठ पमोठी असून इथे जवळपास 35 तें 40 गावाचे लोकं बाजार करण्याकरिता येतात व या गावात बैंक ऑफ महाराष्ट्र ची शाखा असून या बैंकेत टेंभुर्डा गाव परिसरातील किमान 10 हजार ग्राहकांचे बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते, आणि मुदत ठेव खाते आहें, महत्वाची बाब म्हणजे बचत गटातून महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या जवळपास 500 महिला बचत गटाचे खाते इथे असून त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असतें, मात्र बैंकेच्या कोणत्याही ग्राहकांना कुठलीही पूर्व सूचना न देता बैंक ऑफ महाराष्ट्र टेंभुर्डा शाखेचे स्थलांतरण वरोरा परिसरात होत असल्याचा निर्णय जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर झाला होता,
दरम्यान बैंक वरोरा येथे नेणार असल्याचे माहीत होताच टेमुर्डा परिसरातील सर्व ग्राहकांनी एकच एल्गार पुकारला की कुठल्याही स्थितीत बैंकेचे स्थलांतरण होऊ देणारं नाही, यासाठी महिला ग्राहकांनी पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या 21 जुलैला टेमुर्डा येथे नागपूर-चंद्रपूर महामार्गांवर रस्तारोको आंदोलन पुकारले होते, ही बाब बैंक व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला कळताचं सूत्र हलले आणि स्वतः बैंकेच्या पदाधिकाऱ्यांनी टेमुर्डा येथे येऊन बैंकेच्या नव्या जागेचा शोध घेतला, दरम्यान एका ठिकाणी बैंकेने जागा निवडली आहें व त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहें त्यामुळे येत्या 21 जुलैला होणारे रस्तारोको आंदोलन पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती टेमुर्डा ग्रामपंचायत च्या माजी सरपंच संगीता आगलावे यांनी भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल चे प्रतिनिधी यांना दिली आहें.
बैंक ऑफ महाराष्ट्र चे नोडलं अधिकारी व झोन अधिकारी यांनी टेमुर्डा येथे येऊन ग्राहक व गावकऱ्यांशी चर्चा केली, काही जागा बघितल्या की आपण कुठे बैंक शाखा सुरु करू, दरम्यान एका सोसायटी च्या जागेत ही बैंक न्यायची असा पनिर्णय सर्वानुमते घेण्यात आला, यासाठी भाडे किती असेल यावर पण चर्चा झाली आणि दोन्ही बाजूने होकारार्थी उत्तर आल्याने आता बैंक ही टेमुर्डा तेथेच राहणार हें जवळपास निश्चित झाले असल्याने उद्याचा 21 जुलैला होणारे रस्तारोको आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते सुरेंद्र देठे, माजी सरपंच संगीता आगलावे, सरपंच सुचिता ठाकरे, जयश्री बोरीकर, नितेश वाटोळे विलास झिले राजू तिखट ईश्वर पावडे वरटकर, प्रमोद चंदनबटवे इत्यादीची उपस्थिती होती.