इतिहासात पश्चिम बंगालची ही निवडणूक देशात नव्या राजकीय क्रांतीची मशाल ठरणार?
निवडणूक वार्तापत्र:-
देशात पहिल्यांदाच एका बाईला हरविण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री प्रचाराला गेले, देशाचे गृहमंत्री प्रचाराला गेले, नव्हे अख्खी भाजपची मंत्रिमंडळासह गॅंग पश्चिम बंगालात तळ ठोकून बसली होती पण एक स्त्री वाघिणीसारखी एकटीने टक्कर दिली, ती एकटी लढली आणि भाजप नेत्यांचा असा फडशा पाडला की आता पश्चिम बंगाल मधून क्रांतीची मशाल देशात नवी राजकीय क्रांती करेल असे संकेत मिळत आहे. खरं तर नंदीग्राम विधानसभा निवडणूक क्षेत्रात त्या व्यक्तिशः हरल्याचा निकाल लागला पण त्यात मोठा घोळ झाल्याची चर्चा आहे पण तरीही ममता बैनर्जी ह्याच मुख्यमंत्री होणार हे निश्चित.
पश्चिम बंगाल मधे काँगेस आणि कम्यूनिस्ट पार्टी यांच्यात आघाडी होती पण इथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी त्रुणमुल काँग्रेस च्या ममता बैनर्जी यांच्यामागे सर्व राजकीय पक्षाची मोट बांधून भाजप विरोधात एक शक्ती निर्माण केली त्यामुळे काँग्रेस व कम्यूनिस्ट पक्षाचे गठबंधन कमजोर झाले पर्यायाने ममता बैनर्जी यांना मोठा फायदा झाला. कदाचित जर काँग्रेस ममता बैनर्जी सोबत असती तर पुन्हा चित्र वेगळ असत आणि भाजप ला ज्या ८० च्या जवळपास जागा मिळाल्या त्या सुद्धा मिळाल्या नसत्या हे तेवढच खरं आहे. आता भाजप ची खिल्ली उडवताना कार्यकर्ते म्हणताहेत की “२०० ची चप्पल ४०० की साडी मोदीके १० लाख के सूट पर भारी.”
evm ची चर्चा का नाही?
पश्चिम बंगाल ची ही विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणात उलटफेर करणारी ठरणार अशीच आहे, कारण भाजप विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे हे चांगले संकेत आहे. ह्या निवडणुकीत evm हा मुद्दा नसला तरी येणाऱ्या सन २०२४ मधे भाजप कडून evm चा गैरवापर करून निवडणुका जिंकण्याचे धोरण ठरणार आहे, कारण क्षेत्रीय राजकारणात evm चा कमी फायदा घ्यायचा आणि राष्ट्रीय राजकारणात तो पूर्णपणे घ्यायचा हे गणित भाजप ने अंगिकारले आहे. राज्यस्तरीय निवडणुकीत evm हा मुद्दा गौण असला तरी भाजपकडून सर्व राजकीय पक्षांना अंधारात ठेऊन मग लोकसभेत त्याचा चांगला फायदा घेण्याची मुभा मिळते. खरं तर निवडणूक आयोगाकडे ज्या २२ लाख evm हैदराबाद व बंगळूर मधून आल्या त्या अजूनही गायब असून प्रत्त्येक निवडणुकीच्या वेळेस ज्या बाहेर ट्रक व इतर वाहनांमधे evm दिसतात आणि काही ठिकाणी पकडल्या जातात त्या आल्या कुठून? याचा शोध अजून पर्यत निवडणूक आयोग किंव्हा पोलीस कां घेत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न असून evm मशीन च्या अदलाबदल करून भाजप निवडणुका जिंकताहेत याबद्दल चर्चा असते आणि म्हणूनच देशात भाजप सरकार विरोधात जनआक्रोश असतांना सन २०१४ च्या मोदी लहर पेक्षा सन २०१९ मधे ३०० च्या वर भाजप चे खासदार निवडून येतात याचे आश्चर्यच आहे. त्यामुळे एनडी टीवीचे पत्रकार रवीश कुमार नेहमी सांगतात की भाजप च्या केंद्रात सत्तेचे खरे गमक हे evm मशीन आहे. त्यामुळे भलेही भाजप पश्चिम बंगाल मधे हरली असली तरी त्यांची लोकसभेत जिंकण्याची तयारी evm च्या माध्यमातून होऊ शकते हे भाजप विरोधातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा!
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा पाठवल्या असून त्यात त्यांनी म्हटले आहे की “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि ह्या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत.
कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, ह्या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्यांच्यात खूपच समानता आहे, आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता ह्याचं महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो.
तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन.