भारतातील कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे CEO अदर पुनावाला यांची “द टाईम्स” ला दिलेल्या मुलाखतीत माहीती.
कोरोना न्यूज नेटवर्क :-
भारतातील प्रत्त्येक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे,असे असतांना भारतातील कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे CEO अदर पुनावाला यांनी “द टाईम्स” ला दिलेल्या माहीतीनुसार त्यांना मोठ्या राजकीय हस्थींकडून धमक्या मिळत आहेत, सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल असे त्यांनी सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
देशातील अनेक राज्यांमधे अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे लसीकरण थोडं लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु लस उत्पादक कंपन्यांवरही काही मर्यादा आहेत. यादरम्यान, कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी आता देशाच्या बाहेरही लस उत्पादन करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. मात्र, ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
अदर पुनावाला यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. , ‘द टाईम्स’ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.
त्यांनी पुढे बोलतांना म्हटलं की हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’, असं पूनावाला यांनी म्हंटल आहे. यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे. असं देखील आदर पूनावाला पढे म्हणाले आहेत. दुसरीकडे, अलिकडेच गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी Y सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते. CRPF द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे.