भाजपच्या मध्यप्रदेश सरकारच्या मंत्री उषा ठाकूर यांनी तोडले अकलेचे तारे.
कोरोना वार्ता:-
देशातील करोनासंकटांत केंद्रात बसलेल्या भाजप सरकारने कोरोना घालवण्यासाठी टाळ्या, थाळ्या वाजवायला लावल्या नंतर दिवे व मोबाईल च्या बैटरिचे लाईट लावायला लावले आणि कोरोना व्हायरस वर प्रतिबंध करण्यासाठी हव्या त्या उपाययोजना न करता जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले त्यामुळे भारतातील प्रत्त्येक राज्यात कोरोना ची दुसरी लाट येऊन लाखों लोकांचा जीव गेला.आता पुन्हा कोरोना ची तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसत असतांना व तज्ञाकडून तसे संकेत मिळत असतांना त्यावर उपाययोजना सरकारची असायला हवी मात्र भाजप च्या मध्यप्रदेश सरकार मधील मंत्री उषा ठाकूर यांनी बेताल वक्तव्य करीत यज्ञ केल्यास कोरोना ची तिसरी लाट येणार नसल्याचे म्हटले आहे.
काही राज्यांनी कडक निर्बंध लावल्याने मागील दोन दिवसांत संसर्गाची गती तुलनेने कमी झाली झाली असली तरी तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. परंतु यज्ञ केल्यास देशात करोनाची तिसरी लाट येणार नाही, असे अकलेचे तारे तोडत मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारमधील पर्यटन तथा सांस्कृतिकमंत्री उषा ठाकूर यांनी मंगळवारी जे वक्तव्य केले ते कर्मकांड किंवा अंधश्रद्धा नसून, पर्यावरणाच्या शुद्धतेसाठी असा यज्ञ आवश्यक आहे अशा त्या म्हणाल्या, करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नागरिक जागरूक आहेत व प्रत्येकाने या यज्ञात दोन-दोन आहुती द्याव्या, असेही ठाकूर म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय रामवन यांनी देशात करोनाची तिसरी लाट येईल, असा इशारा दिला आहे.