Home राष्ट्रीय चिंताजनक :- CBSE, ICSE बोर्डाच्या,12 वी च्या परीक्षेचे काय होणार?

चिंताजनक :- CBSE, ICSE बोर्डाच्या,12 वी च्या परीक्षेचे काय होणार?

 

सर्वोच्य न्यायालयात याचिकेवर होणार 3 जून ला सुनावणी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अद्याप अनिश्चित?

वेब न्यूज नेटवर्क:–

देशात कोरोनाचा अनिश्चित लॉक डाऊन आणि कौरौनाने थैमान घातले असल्याने CBSE बोर्ड अन् ICSE बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षा रद्द कराव्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि. 31) सुनावणी झाली. देशातील हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेल्या या याचिकेवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता या प्रकरणातील सुनावणी गुरुवारी दि. 3 जून ला होणार आहे.

या संदर्भात ममता शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारतर्फे अ‌ॅटर्नी जनरल के. के. वेणुगापोल यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात केंद्र सरकार 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला गुरुवारपर्यंत वेळ द्यावा अशी विनंती वेणुगोपाल यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे. ममता शर्मा यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या संकटात 12 वीची परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन घेणे शक्य नाही. या परीक्षेचा निकाल उशीरा जाहीर झाल्यास परदेशी विद्यापीठांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण तसेच शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करून मर्यादित वेळेत वस्तुनिष्ठ पद्धतीने 12 वीचा निकाल जाहीर करावा, अशी विनंती याचिकेत केली आहे.

याचिकेत शर्मा यांनी केंद्र सरकार, सीबीएसई,CBSE आयसीएसई बोर्ड यांना पक्षकार केले आहे. 12 ची परीक्षा अन् त्यानंतर उशीरा लागणाऱ्या निकालामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षावर गंभीर परिणाम होण्याची भीती याचिकेत व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here