मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला केल स्पष्ट.
न्यूज नेटवर्क -:
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे आपल्या तथाकथित पत्नी असलेल्या करुणा शर्मा यांच्या विरोधात काही लोकांना समोर करून त्यांना गुन्ह्यात अडकवीत असल्याचा राज्यातील सूर बघता त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन ज्या प्रकारे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ती आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असल्याचे दिसत आहे.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना पोलिसांनी कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ड्रायव्हरला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे.
करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कुणी ठेवलय?
करुणा शर्मा यांच्या गाडीत कालपिस्तूल आढळून आलं असल्याचा आरोप करून त्यांच्यासह त्यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यांच्या गाडीत एका व्यक्तीने ती पिस्तूल ठेवली असावी असे व्ह्ययरल विडिओ मधून दिसून येत आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून करुणा शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ व पिस्तूल च्या प्रकरणात अडकवीत आहे अशी ओरड सर्वत्र होत आहे. कारण ज्याअर्थी करुणा शर्मा ह्या परळीत कुणाला ओळखत नाहीत. कोण कोणत्या जातीचा आहे हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्या कुणाला जातीवाचक शिवीगाळ कशा काय देतील? दलित समाजाला पुढे करून शर्मा यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हे चुकीचं आहे. दलित समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून अॅट्रोसिटी कायद्याचाही गैरवापर असल्याचं आंबाजोगाई कोर्टाबाहेर भीमसैनिकांनी
म्हटलं आहे