स्वतंत्र भारतात मोदी सरकारकडून गुलामगिरीची मुहूर्तमेढ?
लक्षवेधी:-
ज्या महामानव महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले,त्या महामानवाची जयंती भारतात मोठ्या उत्सवात साजरी केल्या जाते. पण महात्मा गांधी यांनी जे स्वातंत्र्य मिळवून देऊन देशात लोकशाही आणली ती जिवंत आहे का? लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आहे असं आपण म्हणू शकतो का? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ज्या इंग्रजांच्या जोखड्यातुन भारत देश स्वातंत्र्य झाला आज तोच देश मोदी शहा च्या तानाशाही धोरणामुळे जणू अडाणी अंबानी यांच्या ताब्यात दिल्या जात असून देशातील जनतेला गुलाम बनविल्या जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टाने देशाची जीडीपी ठरते आज तोच शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करताहेत पण त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही. तीन कृषि कायदे हे शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आहेत ते मागे घ्यावे म्हणून दिल्लीत वर्षभर आंदोलन करणारे शेतकरी हे यांना नक्षलवादी आणि दहशतवादी वाटतात ते भारताचे दुश्मन वाटतात आणि देशाची संपती लुटून नीरव मोदी,मेहूल चौक्षी व इतर गुजराती लाखों कोटी घेऊन विदेशात पळून गेले त्यांच्यावर मात्र कारवाई नाही ही देशाची खरी शोकांतिका आहे आणि म्हणून सर्वसामान्य देशवासीयांना मोदी सरकार कडून गुलाम बनविण्याची मुहूर्तमेढ रोवल्या जात असल्याने महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्याला जणू किंमत राहिली नाही कारण गोरे इंग्रज राज्यकर्ते गेले आणि आता देशातील संपती काही ऊद्धोगपती यांच्याकडे देऊन मोदी शहा यांच्याकडून देश गुलाम बनविल्या जात आहे. ही परिस्थिती बघून खरंच गांधी असते तर त्यांना काय वेदना झाल्या असत्या हे न बोललेच बरे.
भाजप चे धोरण हे सर्वसामान्य माणसाचे आता मरण ठरत आहे. कारण नोटाबंदी करून रांगेत लोक मारली गेली. पूलवामा घडवून सैनिक मारल्या गेले. कोरोना आणून देशातील लाखों लोकांना मारल्या गेले आणि आता देशात तीन कृषि कायदे आणून शेतकरी यांना मारण्याचा पर्यायाने देशात अडाणी अंबानी यांची सत्ता प्रस्थापित करून देशातील जनतेला गुलाम बनविण्याचा कार्यक्रम मोदी सरकारचा दिसतोय कारण आज देशाची रेल्वे. पोस्ट. बीएसएनएल. सरकारी ब्यांका इथपर्यंत की देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे ते डिफेन्स पण विकली जात आहे तर मग देश म्हणून देशाची संपती म्हणून शिल्लक काय राहणार आहे? ज्या प्रमाणे देशातील संपतीवर इंग्रजांची सत्ता होती तीच सत्ता स्वातंत्र्य भारतात अडाणी अंबानी ची राहणार असेल तर देश स्वातंत्र्य आहे का? याचे चिंतन मनन करण्याची आवश्यकता आहे. कारण हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या भगतसिंह राजगुरू सुकदेव यांना फासावर जावे लागले, यासाठी लाखो देशभक्तांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या सांडलेल्या रक्तातून देशाच्या स्वातंत्र्याची पहाट उगवली आज तोच देश पारतंत्र्यात जात असेल तर बापू तूम्हचा स्वतंत्र देश पुन्हा गुलाम होतांना कसे बघत असाल? हा प्रश्न महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्याने नक्कीच विचारावासा वाटतो कारण नवी पिढी बरबाद होतांना व हा देश बरबाद होतांना बापू नक्कीच ढसाढसा रडत असेल?