मनसे शहर उपाध्यक्ष राजू चौधरी यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन.
गडचांदूर प्रतिनिधी :-
गडचांदूर शहरात शहराचे अत्यंत मध्यभागी देशी दारूची दुकाने पुनश्च सुरू झालेली आहेत. वाघोबाचे मंदिर या वर्दळीच्या ठिकाणी गुलाब शेंद्रे यांचे देशी दारूचे दुकान सुरू झाले असून परिसरात मोठे दुर्गा मातेचे मंदिर असल्याने भाविकांची गर्दी असते शिवाय लागुनच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे व खाजगी दवाखाने ४ ते ५ आहेत या मार्गाने महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी या मार्गाने प्रवास करीत असतात. या विद्यार्थ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व देशी दारूची दुकाने शहराच्या बाहेर नेण्यात यावे अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्ष राजू चौधरी यांनी नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गडचांदूर शहरात वर्दळीच्या ठिकाणी बाहेरगावातून येणारे व स्थानिक नागरीक, सामान्य शेतकरी, शिक्षिका, निराधर महिला व बाहेरून येणारे बॅकचे ग्राहक लाईट बिल भरण्यासाठी अन्य नागरीक याना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. दारू प्राशन करणारे येथील दारू पिणारे व्यक्ती येथील वर्दळीत येणाऱ्या महिलांची छेड काढणे त्यांना एकटी असल्याचे बघून अश्लिल शब्दाचा वापर करणे. इत्यादी प्रकार होतं असतात. अगोदरच भारतीय स्टेट बँक गडचांदूर येथील बाजुला लागून असलेले रौफ खान वजीन खान यांचे सुध्दा देशी दारूचे दुकान सुरू झालेले आहेत. यामध्ये बँकेमध्ये येणारे ग्राहक यांना येथील दारू पिऊल असलेल्या लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे या गंभीर बाबीवर अंकुश लावणे कठीण आहे. तसेच राजीव गांधी चौक येथे भाऊराव रणदिवे व शहीद बिरसा मुंडा चौक येथे दिंगाबर लांजेकर व इतर त्यांची दुकाने सुरू झाल्याने मोठया प्रमाणात गभीर अपघात होण्याची शक्यता बघता गडचांदूर शहरातील सर्व देशी दुकाने शहराचा विस्तार बघता शहाराबाहेर नेण्यात यावे अशी मागणी राजू चौधरी यांनी केली आहे.