Home वरोरा खळबळजनक :- खुनी हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ढेंगळे यांना अटक.

खळबळजनक :- खुनी हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ढेंगळे यांना अटक.

जुन्या शेतीच्या वादावरून एका वृध्द व्यक्तीवर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याने पोलिसांची मोठी कारवाई.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे यांचे जमीन खरेदी व्यवहार तालुक्यात गाजत असून अनेक शेतकऱ्यांची त्यांनी फसवणूक केली असल्याची माहिती आहे. अशाच एका शेतीच्या वादातून अमृत पांडूरंग आगलावे (६१) या वृध्द शेतकऱ्यावर त्यांनी व त्यांच्या पत्नीने प्राणघातक खुनी हल्ला केला होता व चंद्रपुरातील एका खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांचा उपचार सुरू होता. त्यानंतर तब्बल 12 दिवसांनंतर अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे यांना काल सायंकाळी अटक करून वरोरा पोलीस स्टेशनच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहे. ढेंगळे यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा मुर्डा येथील शेतात सुरू असलेले बांधकाम बघण्यासाठी अमृत पांडूरंग आगलावे (६१) या वृध्द शेतकरी गेले होते दरम्यान जुन्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चिरकुटा गोपाळ ढेगळे व त्याची पत्नी वंदना चिरकुटा ढेंगळे यांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी फिर्यादी यांना सहकार्य न करता आरोपी मारेकऱ्यांना सहकार्य करीत थातूरमाथूर कारवाई केल्याने आरोपी मोकाट आहेत व त्यांचेपासून पुढे धोका असल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमृत आगलावे यांची मुलगी अर्चना गाडगे यांनी दि. १९ नाव्हेंबरला चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली होती.

या प्रकरणी अर्चना गाडगे,अजय गाडगे, कोमल सातकर, संगिता आगलावे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे तक्रार केली होती व त्या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्याकडे सोपविण्यात आली आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे यांना अटक केली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here