Home महाराष्ट्र किती असेल कापसाचे पुढील महिन्यात भाव? शेतकऱ्यांच्या घरातचं पडला कापूस

किती असेल कापसाचे पुढील महिन्यात भाव? शेतकऱ्यांच्या घरातचं पडला कापूस

आंतरराष्टीय बाजारात येईल का पुन्हा तेजी ? जाणून घ्या सविस्तर.

वरोरा प्रतिनिधी :

या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे अन्य पिकासह कपासचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना महागड्या फवारणीचा वापर करावा लागला तरी देखील कापसावर लाल्या रोग व बोंडअळीचा प्रदर्भाव झाला व त्यामुळं पाहीजे त्या प्रमाणांत कापसाचे उत्पन्न होऊ शकले नाही पण मागील वर्षी कापूस 15 हजारांवर गेला होता त्या तुलनेत यावर्षी किमान 10 हजार तरी कापसाला भाव मिळेल या अपेक्षेत शेतकरी होते पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे सद्ध्या कापसाचे भाव 8 हजारांच्या वरती जायला तयार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस घरिच साठवून ठेवला आहे.

चालू हंगामात सुरुवातीला कापसाचा चांगला भाव मिळाला परंतु त्यानंतर भावात मोठी घसरण झाली सध्या कापसाला प्रती क्विंटल जवळपास 8 हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहे परंतु शेतकऱ्यांना जर आपल्या पिकाचा चांगला भाव घ्यायचा असले तर शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कापसाचे भाव बांधण्याची शक्यता ?

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी मार्केट यार्डवर कमी भाव मिळत असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्यास कापसाच्या भाव तेजी येऊ शकते अशी कापूस व्यापाऱ्यांना शाश्वती आहे, दरम्यान शेतकऱ्यांनी खाजगी व्यापऱ्याना कापसाची विक्री करू नये यामध्ये त्यांची फसवणूक होऊ शकते. कारण या वर्षी कापासला चांगला भाव मिळत नसला तरी येणाऱ्या फेब्रुवारीत आंतराष्ट्रीय बाजारात कापसाची आवक घटल्याने कापसाच्या भावात मोठी वाढ होऊ शकतो.

Previous articleखळबळजनक:- नकली नोटांचा बाजार पुन्हा जोरात ? काय आहे सत्य ?
Next articleफ्लाय ऐशचा हायवा सुपर मार्केट मधे घुसला तो हायवा कुणाचा ? .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here