Home वरोरा कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांची नोंदणी आता २१ फेब्रुवारी पर्यंत चालणार.

कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांची नोंदणी आता २१ फेब्रुवारी पर्यंत चालणार.

मनसेच्या नोंदणी अभियानात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी दिली मुदतवाढ.

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात जवळपास 15 शेतकरी भाजप सेना युती व महाविकास आघाडी या दोन्ही सरकारच्या कर्जमाफीपासून वंचित असून ५० हजार प्रोत्साहन राशी पासून वंचित शेतकऱ्यांची संख्या सुद्धा २ हजारांच्या जवळपास आहे, शिवाय स्थानिक तहसील प्रशासन व तलाठी यांच्या निष्काळजीपनांमुळे अतिवृष्टी चे पैसे सुद्धा जवळपास १२०० शेतकऱ्यांना मिळाले नाही एकूणच शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळाला नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या पुढाकाराने वरोरा तालुक्यातील वरोरा, शेगांव, खांबाडा, टेमुर्डा, चिकनी, नागरी, माढेळी या ठिकाणाच्या सेतूकेंद्रात शेतकऱ्यांना आपली नोंदणी करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली होती. ही नोंदणी १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत चालणार होती परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात चणा कापूस यांची काढण्याची घाई असल्याने शेतकऱ्यांना वेळ मिळाला नसल्याच्या सूचना आल्याने आता ही नोंदणी २१ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

या नोंदणीला मिळालेला प्रतिसाद बघता कुणी शेतकरी त्यांच्या हक्कांपासून वंचित राहू नये याकरिता हया नोंदणीची तारीख वाढवलेली असून या संदर्भात सर्व वंचित शेतकऱ्यांना घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात न्याय मिळावा यासाठी मनसे तर्फे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व नंतर मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या नोंदणी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे.जिल्हा सचिव विनोद सोनटक्के विशाल देते. रामराव पाचभाई. प्रशांत बदकी नजू वादाफळे, मोहित हिवरकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर, विनोद खडसंग, राजेंद्र धाबेकर, मनोज गाठले. पवन ढोके, जयंत ढोके, जयंत चौधरी, पंकज पेटकर, धनराज बाटबर्वे, शंकर क्षिरसागर मनोहर खिरटकर, चिंतामण बेले, अतुल गावंडे, दिलीप दोहतळे, अभय आसुटकर, प्रमोद हनवते, अशोक दाते. महेंद्र गारगाटे. दिनेश जुमडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here