Home वरोरा उपक्रम :- वरोरा तालुक्यातील दहेगावचे सरपंच विशाल पारखी यांचा अनोखा उपक्रम.

उपक्रम :- वरोरा तालुक्यातील दहेगावचे सरपंच विशाल पारखी यांचा अनोखा उपक्रम.

चक्क स्मशान भूमीच्या जागेवर हजारो वृक्ष लावून उभारले भोलेनाथांचे मंदिर, महाशिवरात्रीला केले स्मशान भूमीत कीर्तनाचे आयोजन.

वरोरा प्रतिनिधी ;-

जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही शक्य होऊ शकते असं आपण नेहमी थोरांच्या भाषणांमधून ऐकत असतो पण अशी फार कमी उदाहरणं आपल्याला बघावयास मिळत असते, त्यातच गावांतील सरपंच यांनी असे उदहारण जगासमोर ठेवणे हे तितकेच प्रेरणादायी असते,त्यात पाटोद्याचे भास्कर पेरे पाटील असेल किंव्हा हिवरे बाजार गावाचे पोपटराव पवार असेल यांनी अख्ख्या भारतात सरपंच कसा असावा याचा आदर्श समोर ठेवला आहे. याच धर्तीवर वरोरा तालुक्यातील दहेगांव ग्रामपंचायत चे सरपंच विशाल पारखी यांनी आपला गावांत स्मशान भूमीच्या जागेवर जवळपास ३ हजार पेक्षा जास्त झाडे लावून व त्याच ठिकाणी भोले शंकराचे मंदिर उभारून आदर्श निर्माण केला आहे.

वरोरा तालुक्यातील दहेगाव हे औधोगिक क्षेत्रात आहे अगदी यांचं संधीचा फायदा घेऊन सरपंच विशाल पारखी यांनी गांव विकासाचं नवं धोरण अवलंबून गावांतील पायाभूत विकासासह स्मशान भूमीत एक जणू बगीचा निर्माण केला की काय ? असे चित्र दिसत आहे. या परिसरातील जवळपास २ एकर जागेत जवळपास ३ हजार पेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे लावून हा परिसर सुशोभित केला तर यांचं परिसरात भगवान शंकरजी यांचे मंदिर बांधून इथे भक्तिमय वातावरण निर्माण केले. यांचं ठिकाणी महाशिवरात्रीला डोंगरगाव येथील प्रशिद्ध किर्तनकार खिरटकर महाराज यांचे किर्तन ठेऊन येथील समाजप्रबोधन करण्यात आले. विशाल पारखी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होतं असून या परिसरातील सरपंचांनी विशाल पारखी यांचा आदर्श घ्यावा असे किर्तनकार खिरटकर महाराज यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here