अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
शेगांव :- पोलिस स्टेशन शेगांव बू येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमीत्त व रमजान ईद निमित्याने मासिक मीटिंग घेऊन पोलिस पाटील यांना या उत्सवाबाबद मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय गावात सन उत्सव शांततेत कसे साजरे करता येईल यावर अधिक लक्ष द्यावे अशा वरिष्ठांकडून उत्सवानिमीत्त प्राप्त परिपत्रकाची माहिती देऊन उस्तव शांततेत पडावे अशा सूचना देण्यात आल्या. तसेच पोलीस स्टेशन शेगाव बु येथील पोलिस हवालदार मदन येरणे हे रजेवर असताना देखील आपले कार्य बारकाईने करून ते पूर्ण तपासाचे काम उत्कृष्ट करतात. पोलिस स्टेशन मध्ये सर्वांच्या कामाला मदत करतात तपास लेखाजोगा पेंडिंग ठेवत नाही अशा अनेक त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांचा कामाचा गौरव होऊन इतर अमालदर प्रेरित व्हावे यासाठी त्यांना पुष्प गुच्छ, सन्मानपत्र, मोमेंटो देऊन त्यांना गौरविण्यात आले. मार्च महिन्यात मध्ये सीसीटीएनएस प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम करणारी महिला पोलीस माधुरी हिचा पण पुष्प गुच्छ, सन्मानपत्र, मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला.
आणि मार्च महिन्यात उत्कुष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटील मंगला पोटे रा. मोखाडा हिचे सुध्दा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, मोमेंटो देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आले. कार्याची दखल घेऊन पोलीस शिपाई तसेच पोलीस पाटील यांचा
सत्कार येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी psi श्री प्रवीण जाधव, श्री महादेव सरोदे, श्री किशोर पिरके, पोलीस शिपाई श्री देवा डुकरे, रमेश पाटील, अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… व