Home वरोरा लक्षवेधक:- दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त समितीचा आता मशाल मोर्चा.

लक्षवेधक:- दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त समितीचा आता मशाल मोर्चा.

बैलबंडी मोर्चाची दखल न घेतल्याने प्रशासन आणि सरकार विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा मैदानात.

प्रतिनिधी — पवन ढोके ( वरोरा )

वरोऱ्या तलुक्यातील अंतर्गत येणाऱ्या दिंडोरा बॅरेज प्रकल्प हा चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे, दरम्यान दिंडोरा बॅरेज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमीनी अत्यंत कमी किंमतीत खरेदी करून शासनाने शेतकऱ्यांची एक प्रकारे आर्थिक पिळवणूक केली आहे, एकरी फक्त 25 ते 30 हजार रक्कम देऊन शेतकत्यांच्या जमीनी भूसंपादन करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे शेतजमिनी राहिल्या नाही,

शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कवडीमोल भावाने सरकारने घेऊन प्रकल्पग्रस्तांना नौकऱ्या दिल्या नाही व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. त्यामुळे दिंडोरा प्रकल्प ग्रस्तांना नवीन कायद्या नुसार लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा यासाठी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विठ्ठल रखुमाई मंदिर सावंगी जोड ते दिंडोरा बॅरेज प्रकल्प वर जोरदार मशाल मोर्चा काढण्याचे जाहीर केले असून प्रशासन आणि सरकार चे लक्ष वेधुन घेण्यसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, दरम्यान या आंदोलनात 1000 शेतकरी व त्यांची लहान मुलं बाळं सोबत उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

तरी सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य तो 2013.14 च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावा असे आवाहन केले आहे. दिंडोरा बॅरेज चा वाढीव पॅकेज मोबदला शासनाने प्रकल्पग्रस्तांना देणे अपेक्षित असतांना ही मागणी कुठेही विचारत न घेता प्रकल्पाचे कामाला सुरवात केली आहे आणि प्रकल्प ग्रस्त शेतकरी लोकांना रस्त्यावर सोडल आहे तरी प्रशासनाने काम बंद पाडून शेतकऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा प्रकल्प ग्रस्थ समिती पुन्हा 15 दिवसांनी पूर्ण पणे काम बंद आंदोलन करेल असा इशारा प्रशासनाला आणि सरकारला दिंडोरा बॅरेज संघर्ष समितीने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here