Home Breaking News वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा सुधीर मुनगंटीवार

वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा सुधीर मुनगंटीवार

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी ,नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here