अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- येथील जिल्हा परिषदेंतर्गत विविध संवर्गातील वर्ग 3 तसेच ४ मधील कर्मचाऱ्यांच्या सन २०२३ या सत्रातील सर्वसाधारण बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
यामध्ये ६ व ७ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहामध्ये समुपदेशनाने प्रशासकीय तसेच विनंती बदली केली जाणार आहे. एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची मुख्यालयांतर्गत बदली केली जाणार आहे. आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, वित्त विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांचा समावेश आहे.
या विभागातील कर्मचाऱ्यांची बदली
आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, वित्त विभाग, कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, पंचायत विभाग, शिक्षण तसेच सामान्य प्रशासन विभागातील संवर्ग ३ तसेच ४ अंतर्गत कर्मचायांची बदली होणार आहे. वर्ग ३ मधील सर्व संवर्गात प्रशासकीय व विनंती बदली होणार आहे.
अशी आहे बदली पक्रिया शनिवार, ६ मे व रविवार, ७ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, १६ ते २५ मे या कालावधीत पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरावरील समुपदेशन बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
६ मे २०२३
आरोग्य विभाग, महिला व बाल
कल्याण, वित्त विभाग, कृषी, पशुसंवर्धन विभाग बदली ■ सिंचन विभाग, ग्रामीण पाणी
७ मे २०२३
पुरवठा विभाग, बांधकाम विभाग,
पंचायत विभाग, शिक्षण विभाग,
सामान्य प्रशासन विभाग.