Home Breaking News मनपाच्या ४० कामांचे एकाच दिवशी मूल्यमापन 

मनपाच्या ४० कामांचे एकाच दिवशी मूल्यमापन 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील नवीन रस्ते आणि नाली बांधकामाचे थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे काम ब्रह्मपुरीच्या शासकीय पॉलिटेक्निकला देण्यात आले असून, या पॉलिटेक्निकच्या पथकाने एकाच दिवशी ४० कामांचे मूल्यमापन केल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. अवघ्या पाच ते सहा तासांत ४० कामांचे मूल्यमापन केल्याने थर्ड पार्टी ऑडीटच्या कामावर संशय व्यक्त केला जात आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते आणि नाली बांधकामाचे थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय अंतिम बिल काढले जात नाही. त्यामुळे कामाचे मूल्यमापन करावेच लागते. काही महिन्यांपूर्वी हे काम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे होते. मात्र, कामाच्या व्यापामुळे शासकीय

अभियांत्रिकी महाविद्यालयाने मनपाचे थर्ड पार्टी ऑडिटचे काम सोडले. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने ब्रह्मपुरी येथील शासकीय पॉलिटेक्निककडे हे काम दिले. साधारणतः आठ-नऊ महिन्यात सुमारे ३५ ते ४० कोटी रुपये किंमतीची रस्ते आणि नाली बांधकामे करण्यात आली. बांधकामाच्या किंमतीच्या एक टक्का रक्कम थर्ड पार्टी ऑडिटला देण्यात येते. त्यामुळे योग्य मूल्यमापन करण्याची नैतिक जबाबदारी ही

संबंधितांचीच असते.

थर्ड पार्टी ऑडिटमध्ये विना विध्वंसक चाचणी (नॉन डिस्ट्रक्टीव टेस्ट) केली जाते. त्यासाठी रिबाउट हॅमरची आवश्यकता असते. नियमितपणे अशी चाचणी करीत असलेल्या अनुभवी आणि तज्ज्ञांच्या मते एका कामाचे मूल्यमापन करण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागतात. मूल्यमापनामध्ये

कॉन्टीटी तपासली जाते. मेजरमेंट बुकात (एमबी रेकॉर्डींग) नोंदी घेतल्या जातात. महानगरपालिकेच्या अनेक कामातील मूल्यमापन करताना एमबी रेकॉर्डमध्ये ही हेराफेरी करण्यात आली. तसेच क्वॉलिटीसुद्धा तपासण्यात आली नाही. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार सिमेंटच्या एका बोरीचे मिश्रण तयार करताना साधारणतः २० लिटर पाणी वापरावे. त्यापेक्षा अधिक पाणी वापरल्यास त्या मिश्रणाचा दर्जा कमी होतो. जाळ मिश्रण झाल्यास अधिक साहित्य लागते. तर पातळ मिश्रणात साहित्य कमी लागते. त्यामुळे कंत्राटदाराकडून पातळ मिश्रणाचा मारा केला जातो. मनपातील अधिकारी आणि थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या एजंसीला हाताशी धरून कंत्राटदार आपली पोळी शेकून घेत आहे. ब्रह्मपुरीच्या शासकीय पॉलिटेक्निककडे।  मनपाच्या ४० कामांचे एकाच दिवशी मूल्यमापन ! कामाची क्वॉलिटी आणि मूल्यमापनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध आहेत की नाही, याबद्दलही शंका व्यक्त केली जाते. गेल्या आठ-नऊ महिन्यात जवळपास २५० कामांचे मूल्यमापन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी चक्क एकाच दिवशी ४० कामांचे मूल्यमापन करण्याचा प्रताप थर्ड पार्टी ऑडिटने केला आहे. या मूल्यमापनाबाबत ब्रह्मपुरीच्या शासकीय पॉलिटेक्निकमधील सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अनिल पावडे आणि प्रा. डॉ. धनंजय परबत यांच्याशी संपर्क साधला असता प्रा. पावडे यांनी सध्या माझ्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. तर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालिवाल यांनी. कामाच्या किंमतीच्या एक टक्का रक्कम थर्ड पार्टी ऑडिटला देत असल्याने मूल्यमापन करण्याची त्यांची जबाबदारी आहे, असे सांगून त्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला

Previous articleसनसनिखेज:-:घुग्गुस पोलीस स्टेशनमधे असली आरोपीला सोडून नकली आरोपीवर गुन्हा दाखल.
Next articleमहाराष्ट्र दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here