Home मुलं तुम्ही स्वतःसाठी प्लॉट घेत आहात तर सावधान कृषक जमिनीवर अनधिकृत प्लॉट

तुम्ही स्वतःसाठी प्लॉट घेत आहात तर सावधान कृषक जमिनीवर अनधिकृत प्लॉट

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मुल :- आर्थिक लाभासाठी जो-तो दलाल बनून लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दलालाच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने मूल नगरात व तालुक्यात जमिनीच्या दरात प्रचंड वाढ झालेली असून ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून चंद्रपूरची शहराची ओळख असलेल्या शहरापेक्षा तालुका असलेल्या मुल नगरात प्लॉटच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत.

यामधे दलालाची भूमिका महत्वाची असल्याची चर्चा नगरांमध्ये केली जात आहे. शेती एकच परंतु त्याच शेतीला व भूखंडला पलटी मारून अनेकांना विक्री करण्याचा प्रकार राजरोसपणे मुल येथे सुरु आहे, त्यातच मूल नगरात कृषक जमिनीवर लेआऊट टाकुण भूखंड विकण्याचा गोरखधंदा तेजीत सुरु आहे.

मूल नगर पालीका क्षेत्रातील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भूखंड खरेदी विक्रीचाही व्यवहार दलालांच्या मार्फतीने मोठया प्रमाणावर केले जात आहे, एकाच भूखंडाची विक्री अनेकांना जास्त दरात करण्याचा सपाटा काही दलालामार्फत होत असल्याने अनेक दलाल आजही करोडो रुपयाच्या घरात खेळत आहे. एकच भूखंड जास्त दरात विक्री करुन देण्याचे आमीष काही दलालांकडून दाखविल्या जात असल्याने मुल नगरात भूखंडाचे दर चंद्रपूर पेक्षाही गगणाला भिडले आहे. परंतु गरजु व्यक्ती भूखंड विक्री करीत नसल्याने आता मूल शहरातील लेआऊट मधील भूखंड विक्रीसाठी शिल्लक राहिलेले नाही, यामुळे आता कृषक असलेल्या शेतामध्येही अनधिकृत लेआऊट टाकुण नगर परिषदेची कुठलीही अधिकृत परवानगी नसताना भूखंड विक्री करण्याचा प्रकार मूल शहरात राजरोषपणे केला जात आहे.

सुमारे पाचशे रुपये पासुन तर सातशे रुपये स्क्रेअर फुट पर्यंत कृषक लेआऊट

मधील भूखंड विक्री केल्या जात आहे. 11 हजार रुपये घेवुन भूखंडाची बुकींग करण्याचे आमीषही आऊट धारकाकडुन दिल्या जात आहे. परंतु ‘येलो’ बेल्ट शेती असल्याशिवाय नियमानुसार लेआऊट टाकता येत नाही. असा शासकीय नियम आहे. तरी देखील आर्थिक लाभापोटी कृषक जमिनीवरच अनधिकृत लेआऊट टाकने आणि झेंडे लाऊन सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तलाठी कार्यालयात नेहमी दलालांची गर्दी

मुल येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या तलाठी कार्यालयात शेती व भूखंड खरेदी विक्री करणाऱ्या दलालाची नेहमीच गर्दी दिसून येत आहे. काही दलालांचे संबंध तेथील कर्मचारी यांचेसोबत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारची दलाली करणाऱ्यांना शासकीय परवानगीची गरज नाही का, अशी चर्चाही नगरात केली जात आहे.

लेआऊटला परवानगी नसलेले प्लॉट विकत घेऊ नये. मुख्याधिकारी न. प. चे नागरिकांना आव्हान

मुल नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात येत असलेल्या येलो बेल्ट असलेल्या शेतजमिनीवर लेआऊट टाकून प्लॉट विक्री करणे कायदेशीर रित्या अधिकृत नाही. आणि मुल नगर परिषदेने अनधिकृत लेआऊटला कुठलीही व कसलीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी जागृत राहावे. अनधिकृत प्लॉट खरेदी करु नये तसेच कोणताही आर्थिक व्यवहार करु नये असे आव्हान नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here